spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

BMC आयुक्त इक्बाल सिंग चहल ईडी कार्यालयात दाखल

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल (Brihanmumbai Municipal Corporation Commissioner Iqbal Singh Chahal) यांनी सोमवारी कोविड-१९ काळजी केंद्रांसाठी कंत्राट देण्यात कथित अनियमिततेच्या चौकशीच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. याप्रकरणी ईडीने चहल यांना आपले म्हणणे नोंदवण्यासाठी समन्स बजावले होते. चहल सकाळी ११.४० च्या सुमारास दक्षिण मुंबईतील (South Mumbai) बॅलार्ड इस्टेट येथील ईडीच्या कार्यालयात प्रवेश करताना दिसला. भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी बीएमसीने स्थापन केलेल्या कोविड-१९ केंद्रांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप केला होता .

दरम्यान, मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी ईडी चौकशीला सामोरे जाण्याआधी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. काही अतिरिक्त आयुक्त मुंबई पालिका इक्बालसिंह चहल यांच्या शासकीय निवासस्थानी दाखल झाले होते. कोरोना काळातील कामे आणि घेतलेले निर्णय याबाबत चहल यांची चौकशी होणार आहे. त्यामुळे याच कामांचा आढावा घेण्यासाठी आणि ईडीला उत्तर देण्यासाठी हा आढावा घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.


महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Govt) आल्यानंतर आणि कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत वाढल्यानंतर कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी माजी बीएमसी आयुक्त प्रवीण परदेशी यांची बदली करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ८ मे २०२० रोजी आयुक्तपदी इक्बाल सिंह चहल यांची नियुक्ती केली. आयुक्तपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेत कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी केलेल्या नियोजनाबद्दल, निर्णयाबद्दल आणि विशेष प्रयत्नाबद्दल आयुक्त चहल यांचं देश पातळीवर कौतुक झालं. परंतु कोरोना काळात साथ रोग प्रतिबंध कायदा आणि आपात्कालीन व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कुठलीही निविदा प्रक्रिया न राबवता कोरोना कामाची कंत्राट देण्यात आली आणि याच कंत्राटांना आयुक्तांकडून मंजुरी देताना उद्धव ठाकरे आणि त्या वेळच्या सरकारमधील नेत्यांच्या निकटवर्तीयांना कंत्राट दिल्याचा आरोप किरीट सोमया यांनी केला आहे.

हे ही वाचा:

उर्फीच्या वादात शर्मिला ठाकरेंची उडी

नारायण राणेंच्या हस्ते G-20 परिषदेची सुरुवात

राशी भविष्य,१५ जानेवारी २०२३, आजचा दिवसातील घडणाऱ्या घडामोडी तुम्हाला …

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss