spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नॉट रिचेबल असलेल्या शुभांगी पाटील अखेर आल्यामोर, नॉट रिचेबलचे कारण योग्य वेळेवर सांगेन

नाशिक पदवीधर मतदारसंघात ठाकरे गटाने पाठिंबा दिलेल्या उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) या सकाळपासून नॉटरिचेबल असलेल्या शुभांगी पाटील या अखेर समोर आल्या आहेत.

नाशिक पदवीधर मतदारसंघात ठाकरे गटाने पाठिंबा दिलेल्या उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) या सकाळपासून नॉटरिचेबल असलेल्या शुभांगी पाटील या अखेर समोर आल्या आहेत. त्या अचानक सकाळपासून गायब झाल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. अखेर शुभांगी पाटील या समोर आल्या आणि त्यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, ‘मी माझ्या उमेदवारी ठाम होते, ठाम आहे. मी कुठेही गेली नव्हते. मला ठाकरे गटाचा पाठिंबा आहे. तसेच नॉट रिचेबल होण्याचं कारण योग्य वेळेवर सांगेन, काहीतरी कारण असल्याशिवाय व्यक्ती नॉटरिचेबल होत नाही असेही त्यांनी सांगितले.तसेच शुभांगी पाटील पुढे म्हणाल्या, हे सर्व राजकारण आहे त्यामुळे ते कसं वळण घेईल याची शाश्वती देता येत नाही. उद्धव ठाकरे मला पाठिंबा देतील असा मला पुर्ण विश्वास आहे. यासह नाना पटोले, अजित पवार, जयंत पाटील महाविकास आघाडीच्या सर्वपक्षश्रेष्ठींवर मला विश्वास आहे, असेही शुभांगी पाटील म्हणाल्या आहेत. मविआच्या सर्व नेत्यांशी संपर्क केला असल्याचे देखील पाटील यांनी सांगितले.

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापले आहे. आज सकाळ पासून शुभांगी पाटील या गायब होत्या. अखेर अर्ज मागे घेण्याचा वेळ संपल्यानंतर दुसऱ्या कारने शुभांगी पाटील या विभागीय आयुक्त कार्यालयात आल्या. आणि त्यावेळी त्या म्हणाल्या, ‘मी माझ्या उमेदवारी ठाम होते, ठाम आहे. मी कुठेही गेली नव्हते. मला ठाकरे गटाचा पाठिंबा आहे. मी अनेक शिक्षक संघटनांशी चर्चा केली आहे. ते मला पाठिंबा देतील.

पेन्शन योजना असेल, विद्यार्थ्यांचे प्रश्न असेल, यासाठी मी निवडणुकीला उभी आहे, सर्व संघटना मला पाठिंबा देतील असा विश्वास आहे, असं शुभांगी पाटील यांनी ठणकावून सांगितलं.तसेच त्या पुढे ‘सत्यजीत तांबे यांच्याबद्दल मी काही बोलणार नाही. काँग्रेस काय निर्णय घेईल हे सांगता येत नाही. पण, मला महाविकास आघाडीवर पूर्ण विश्वास आहे, ते मला पाठिंबा देतील, असंही पाटील म्हणाल्या. ‘मी अपक्ष उमेदवार असल्यामुळे मला कुणीही संपर्क केला नाही. गिरीश महाजन यांनी संपर्क केला की नाही, त्यावर मी बोललेलं बरं नाही, असं देखील शुभांगी पाटील म्हणाल्या.

हे ही वाचा:

ठाण्यात ‘वाळवी’च्या टीमने दिले रोड सेफ्टीचे धडे

Ved Marathi Movie, तिसऱ्या आठवड्यात देखील ‘वेड’चीच हवा, परंतु लोकांनी रितेशकडे केली एक अनोखी तक्रार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss