spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राशी भविष्य, १७ जानेवारी २०२३, आजचा दिवस मैत्रीसाठी … 

ज्यो. श्री रविंद्र भगवान पाठक गुरुजी, ठाणे.

मेष : तुमचे व्यक्तिमत्व विकसित करणे , समाजापुढे तुमची कला सादर करणे यासारख्या विषयात आजचा दिवस व्यस्त राहील. भाग्योदयातील अडचणी दूर होतील. दूरच्या प्रवासाचे नियोजन कराल. न्यायप्रविष्ट विषयाला आजचा दिवस निर्णायक असेल. आपल्या वरिष्ठांची मर्जी सांभाळण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. बदलीसाठी प्रयत्न करीत असाल तर ती होऊ शकेल.
स्त्रीयांसाठी : आज तुम्ही मंगल कार्याची बोलणी करू शकाल.

वृषभ : आजचा दिवस कुटुंबासाठी द्यावा लागेल. मंगल कार्यासाठी आर्थिक तरतूद करून ठेवाल . आपण जर एखाद्या सामाजिक संस्थेशी जोडलेले असाल तर अनमोल सेवेच्या संधीचा लाभ तुम्हाला प्राप्त होईल. वैवाहिक जीवनात काहीसा मनमुटावं अथवा अनबनी बनून रहाण्याची शक्यता आहे. कोर्ट दरबारी असलेले न्यायप्रविष्ट प्रकरण लांबणीवर पडणे तुमच्यासाठी पथ्यावर पडेल.
स्त्रीयांसाठी : तुम्हाला योग्य मार्गदर्शक भेटेल.

मिथुन : अनेक विषयाला चालना देणारा आजचा दिवस आहे. मात्र वैवाहिक जीवनात सासू नावाची संज्ञा तुम्हाला विचलित करू शकू शकेल. तुम्ही आखलेल्या कार्यक्रमाला उत्तम साथ देणारी मंडळी भेटतील. तुमच्या कामात आज अधिकच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असाल तर इतरांसाठी वेळ द्यावा लागेल. तुमच्या मित्रानी केलेल्या कृत्यामुळे तुम्हाला मनस्ताप सहन करावा लागू शकेल.
स्त्रीयांसाठी : तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने सन्मानाचे स्थान प्राप्त कराल.

कर्क : आजचा दिवस  आपणांस  गतिमंद करणारा आहे. कामाला आवश्यक ऊर्जा प्राप्त व्हावी यासाठी दैवी उपासनेची आवश्यकता आहे. महत्वाची कामे अधिक बिघडण्यापेक्षा आजचा दिवस ते पुढे ढकलणे अधिक हिताचे ठरेल. विसंवादातून तुमच्यावर दोषरोप केले जाऊ शकतात. आर्थिक व्यवहारात संयम आणि नियोजन दोन्हींचा समावेश आवश्यक आहे.
स्त्रीयांसाठी : शाब्दिक मतभेद टाळा .

सिंह : तोलामोलाच्या व्यक्तिमत्वाशी सुसंवाद साधला जाईल. चर्चेतून अनेक विषयाला मार्गस्थ कराल. कुणाची मध्यस्थी केलीच तर तुम्हाला त्याकामी समाधानकारक तोडगा काढण्यात यश मिळेल. तुमचे शब्दप्रभुत्व उत्तम राहील. सामन्यपणे आजचा दिवस उपासना , तीर्थयात्रा , ग्रंथवाचन अथवा नामस्मरण अशा भक्तिमय वातावरणात जाईल.
स्त्रीयांसाठी : भावंडांकडून उत्तम सहकार्य मिळेल.

कन्या : आज तुम्ही चैनीच्या वस्तू अथवा वाहन खरेदी अशा विषयावर सकारात्मक चर्चा कराल. क्षणिक किंवा भौतिक आनंदाच्या प्राप्तीसाठी अवाजवी खर्च होऊ शकेल. व्यवहारात दक्ष असणे जरुरी असते याचे भान ठेवायलाच हवे. आईकडून अधिकचा स्नेह प्राप्त होईल. तुमच्या महत्वाच्या कामात तिचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. कलाक्षेत्रात उत्तम रीतीने सादरीकरण करू शकाल.
स्त्रीयांसाठी : व्यवहारात अडकू नका.

तुला : आजचा दिवस पर्यटनात जाण्याची शक्यता आहे. आपण केलेल्या प्रवासात असे नवीन लोक जोडली जातील की, त्यांच्यापासून तुम्हाला भविष्यात फायदा होईल. खरेदी विक्रीचा नवीन उच्चान्क गाठू शकाल . शैक्षणिक अथवा सामाजिक क्षेत्रातून तुमचा गौरव अथवा सन्मान प्राप्त होईल. तुमचे व्यक्तिमत्व इतरांना आदर्श वाटेल असे कार्य आपल्या हातून घडेल.
स्त्रीयांसाठी : मनोमन आनंदी व्हाल.

वृश्चिक : तुम्हाला उपजत मिळालेल्या दैवी गुणांचा पुरेपूर वापर करा. लोक काय बोलतील अशा विचारात आपला अनमोल वेळ दवडू देऊ नका. उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार करण्याबाबत आपण मांडलेल्या संकल्पनांना व्यवहारात आणण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनतीची आवश्यकता आहे. आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. कर्ज वाढू देऊ नका.
स्त्रीयांसाठी : प्रवास टाळा.

धनु : आजचा दिवस मैत्रीसाठी द्यावा लागेल. जुना मित्रपरिवार भेटल्याने त्याच काळातील आठवनीना देखील उजाळा मिळेल. तुमचे भागीदार आज तुम्हाला व्यावसायिक दृष्टिकोनातून अधिक लाभ वाढविण्यासाठी मोलाचा सल्ला देऊ शकतात. वैवाहिक जीवनात सामोपचार दिसून येईल. तुम्ही प्रकट केलेल्या विचारांना सकारात्मक प्रतिसाद मिळू शकेल.
स्त्रीयांसाठी: मनाचा भार हलका होईल.

मकर : आर्थिक व्यवहार जुळवण्यासाठी वणवण भटकावे लागेल. आपण आपल्या क्षेत्रात अधिक विश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न कराल. वातावरण बदलातून बदलणारी शारीरिक स्थिती तुम्हाला अडचणीची ठरू शकेल. योग्यवेळी वैद्यकीय उपचार घेण्याची आवश्यकता भासेल. कुणालाही अविचाराने शब्द देऊ नका अथवा कुणाच्याही व्यवहारात पडू नका.
स्त्रीयांसाठी : आत्मोन्नती साधाल.

कुंभ : आज तुम्हाला नवीन विषयाचे प्रशिक्षण प्राप्त होईल. दैवी उपासना, गूढ विद्या , वैज्ञानिक दृष्टिकोनातून केलेलं संशोधन अशा विषयात प्रगती कराल. भविष्यात घालणाऱ्या घटनाक्रमाचे अचूक निदान करू शकाल. संतती विषयक प्रश्नावर उपाय मिळतील. शुभ संकेत प्राप्त होतील. जवळच्या प्रवासाचे बेत आखाल . परदेशस्थ व्यवहार सुरळीत होण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त होईल.
स्त्रीयांसाठी : तुमच्या सुप्त गुणांना संधी मिळतील.

मीन : आजचा दिवस खास गृहसजावटीसाठी किंवा घरासाठी उपयुक्त गोष्टींच्या खरेदीबाबत चर्चा करण्यात व्यस्त राहील. कुटुंबातील अधिकतर मंडळी एकत्र आल्याने दिवस आनंदात जाईल. कामाच्या बाबतीत अधिक गतिमान दिवस राहील. ज्या मंडळींना ह्रदय विकाराचा किंवा रक्तदाबाचा त्रास आहे अशांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये.
स्त्रीयांसाठी : मनाचा स्वैरपणा तुम्हाला नुकसानकारक ठरू शकतो.

हे ही वाचा:

घरातल्या घरात बनवा चविष्ट दाल बाटी

तुम्ही मूळव्याधाने त्रस्त आहात ? तर करा ‘हे’ व्यायाम

थंडीत तुमचे हात पाय सुजतात का ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss