spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

उद्या मुंबई मेट्रो १ तब्बल २ तासांसाठी राहणार बंद

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या दि १९ जानेवारी रोजी (गुरुवारी) मुंबईत येत आहेत. दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास नरेंद्र मोदी हे मुंबईत दाखल होणार आहेत.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) हे उद्या दि १९ जानेवारी रोजी (गुरुवारी) मुंबईत (Mumbai) येत आहेत. दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास नरेंद्र मोदी हे मुंबईत दाखल होणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील विविध विकास कामांचं लोकार्पण होणार आहे. तसेच नंतर एमएमआरडीए मैदान, वांद्रे-कुर्ला संकुल, मुंबई येथेही सभा होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. याच पार्श्ववभूमीवर मेट्रो १ (Metro – 1) हि दोन तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे तुही जर मेट्रो ने प्रवास करणार असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.

उद्या दि १९ जानेवारी २०२३ रोजी घाटकोपर आणि अंधेरी (Gharkopar to Andheri) यांना जोडणारी मेट्रो १ हि तब्बल २ तासांसाठी बंद राहणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी सुरक्षा उपायांचा एक भाग म्हणून १९ जानेवारी रोजी संध्याकाळी ५.४५ ते ७.३० या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच या संबधी मेट्रो १ ने दावा केला आहे की प्रशासकीय कारणास्तव सेवा बंद राहतील आणि प्रवाशांना त्यानुसार प्रवासाचे नियोजन करण्यास सांगितले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेक प्रकल्पांचे उद्घाटन करण्यासाठी मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यानंतर ते मेट्रोची राइड घेण्यासाठी गुंदिवली रेल्वे स्टेशनकडे जातील आणि त्यानंतर मेट्रो 2A आणि मेट्रो 7 मार्ग देशाला समर्पित करतील. तसेच नरेंद्र मोदी इतर काही प्रकल्पांसह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या ₹ १,८०० कोटींच्या मेकओव्हरचा शुभारंभ करतील. त्यांच्या मुंबई दौऱ्यात अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचे लोकार्पण करून, मोदी पुढील दोन महिन्यांत अपेक्षित असलेल्या मुंबई नागरी निवडणुकांसाठी भाजपच्या प्रचाराला अक्षरशः सुरुवात करतील. सोमवारी त्यांच्या कार्यक्रमाला पीएमओ आणि महाराष्ट्र सरकारने अंतिम रूप दिले.

हे ही वाचा:

पुण्यातील जुना बाजारातील दुकानांना भीषण आग, दहा दुकाने जळून खाक

‘सामना’त आली, मोदींच्या कार्यक्रमांची पानभर जाहिरात, चर्चांना आले उधाण

Raj Thackeray यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी, परळी कोर्टात राहणार हजर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss