spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Raj Thackeray यांचं अटक वॉरंट रद्द, ५०० रुपयांचा ठोठावला दंड

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena President President Raj Thackeray) यांच्याविरोधात परळी कोर्टाने अटक वॉरंट जारी केलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena President President Raj Thackeray) यांच्याविरोधात परळी कोर्टाने अटक वॉरंट जारी केलं आहे. राज ठाकरे यांच्यावर चिथावणी दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे परळी कोर्टाने राज ठाकरे यांना अटक वॉरंट बजावलं होतं. परंतु अखेर आज परळी कोर्टाने राज ठाकरे यांच्या विरोधातील अटक वॉरंट हे रद्द केले आहे. यासोबतच त्यांना ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. प्रत्यक्ष हजर राहिल्यानंतर त्यांनी आपल्याविरुद्धचं वॉरंट रद्द करण्याची विनंती केली. त्यानंतर कोर्टाने दंड ठोठावून त्यांच्याविरुद्धचं अटक वॉरंट रद्द केलं आहे. अवघ्या ५ ते ७ मिनिटांत ही प्रक्रिया पार पडली.त्यामुळे राज यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे बोलले जात आहे.

या आधी ३ जानेवारी आणि नंतर १२ जानेवारीला राज ठाकरेंना बीडमधील परळी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. पण, १२ जानेवारीला राष्ट्रमाता जिजाऊ जयंती असल्यामुळे न्यायालयाने तारीख वाढवून दिली होती. त्यानुसार, राज ठाकरे आज म्हणजे १८ जानेवारीला परळी कोर्टात हजर राहिले आहेत. आपल्या विरोधातील अटक वॉरंट रद्द करण्याची विनंती राज यांच्याकडून न्यायालयाकडे विनंती करण्यात आली होती. राज यांची विनंती मान्य करत न्यायालयाने राज ठाकरे यांना ५०० रुपयांचा दंड ठोठावून अटक वॉरंट रद्द केला.

आज सकाळच्या सुमारास मनसे अध्यक्ष राज ठाकरे परळीत दाखल झाले आहेत. परळीत पोहोचतात त्यांनी पांगरी येथील दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतलं आहे. यादरम्यान माध्यमांशी बोलण्यास ठाकरे यांनी नकार दिलाय. यावेळी औरंगाबादमध्ये राज ठाकरे हे हेलिकॉप्टरने आले आणि तिथून पुढे त्यांनी गाडीने प्रवास केला. यावेळी औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांच्यातही हुर्डा पार्टीचे आयोजन करण्यात आलं होत. तसेच पुढे परळीमध्ये राज ठाकरे यांचं धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी जंगी स्वागत केलं आहे. राज ठाकरे यांच्या साठी तब्बल ५० फुटांचा हार देखील बनवण्यात आला. गोपीनाथ गड ज्या पांगरी ग्रामपंचायतच्या अंतर्गत येतं त्या पांगरी गावचे सरपंच सुशील कराड यांनी हा हार बनवला आहे. कराड यांच्याकडून राज ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सुशील कराड हे धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आहेत. तसेच राज ठाकरे यांच्या गाडीवर JCB मधून फुलांची उधळणं करत स्वागत केलं आहे. ढोल ताशाचा गजर, फुलांची उधळणं करत त्यांचं स्वागत करण्यात आलं आहे. तसेच या वेळी राज ठाकरे हे गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी नतमस्तक झाले आहेत.

नेमके प्रकरण काय ?

राज ठाकरे यांना ऑक्टोबर २००८ साली मुंबईत अटक झाली होती. राज ठाकरे यांच्या अटकेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी परळीच्या धर्मपुरीत बसेसवर प्रचंड दगडफेकही केली होती. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांसह राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची कोर्टात सुनावणी सुरू झाली होती. ३ आणि १२ जानेवारी रोजी राज ठाकरे यांना कोर्टात हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं.परंतु राज ठाकरे हे कोर्टात हजर राहिले नाहीत. पोलिसांनी या प्रकरणी दोषारोप पत्रही कोर्टात सादर केलं आहे. मात्र राज ठाकरे प्रत्येक तारखेला गैरहजर राहिल्याने अखेर त्यांच्याविरोधात कोर्टाने अटक वॉरंट जारी केलं होतं.

या घटनेनंतर जमावबंदी आदेश मोडणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे आणि चिथावणीखोर वक्तव्य करणे या कारणावरून मनसेच्या काही कार्यकर्त्यांसह राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. यादरम्यान राज्यामध्ये अनेक ठिकाणी अशा स्वरुपाचे गुन्हे दाखल झाले होते. परळी पोलिसांनी या प्रकरणांमध्ये तपास पूर्ण करुन या प्रकरणाचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.

हे ही वाचा:

गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी राज ठाकरे नतमस्तक, तर धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी केलं जंगी स्वागत

Raj Thackeray यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी, परळी कोर्टात राहणार हजर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss