spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्रावरून राजकारण तापलं, राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

सध्या महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापल्याच दिसून येत आहे. येत्या २३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची ९७ वी जयंती साजरा करण्यात येणार आहे. आणि त्याच दिवशी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena chief Balasaheb Thackeray) यांचं तैलचित्र (oil painting) विधान भवनातील सेंट्रल हॉलमध्ये लावण्यात येणार आहे. ‘बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र लावलं जाणार आहे, पण त्यासाठी त्यांचे चिरंजिव आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सन्मानाने बोलावलं जात नाही. उद्धव ठाकरे म्हणायचे, बाप पळवणारी टोळी आली आहे. त्यामध्ये तथ्य आहे’, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर टीका केली.

शिवसेना प्रमुखांचे तैलचित्रं लावताय आणि त्यांच्या चिरंजीवांना आमंत्रण नाही. सावरकरांचं तैलचित्रं लावलं तेव्हा त्यांच्या नातेवाईकांचं निमंत्रण पत्रिकेवर नाव छापलं होतं. ही परंपरा आहे. हा शिष्टाचार आहे. पण आपल्याकडे परंपरा पाळल्या जात नाहीत. या तैलचित्र लावण्यामागे काही राजकारण आहे असं वाटतं. महाराष्ट्रात सूड आणि बदला घेण्याचं राजकारण सुरू आहे. हे निश्चित आहे, असं सांगतानाच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सूड घेत असतील असं वाटत नाही, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.

यावेळी संजय राऊत बोलताना त्यांनी डाव्होस (Davos) दौऱ्यावरूनही मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं. डाव्होस दौऱ्यादरम्यान राज्यात ८८ हजार कोटींची गुंतवणूक आल्याचे सरकारकडून सांगण्यात आलं, यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, ”ज्या दिवशी ८८ हजार कोटींच्या विटा महाराष्ट्रात रचल्या जातील तेव्हाच, यावर बोलता येईल. मात्र, त्यापूर्वी आधी सरकारने राज्याबाहेर गेलेले उद्योग परत आणावे”

हे ही वाचा:

Raj Thackeray यांचं अटक वॉरंट रद्द, ५०० रुपयांचा ठोठावला दंड गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी राज ठाकरे नतमस्तक, तर धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी केलं जंगी स्वागत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss