spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ऋषभ पंतला मिळणार ‘या’ दिवशी डिस्चार्ज

भारतीय संघाचा यष्टिरक्षक (wicket keeper) फलंदाज ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) गुडघ्यावर शस्त्रक्रिया होऊन १० दिवस झाले आहेत. तीन आठवड्यांपूर्वी कार अपघातात गंभीर जखमी झालेला ऋषभ पंत लवकरच मैदानात परतण्याची शक्यता आहे. हेल्थ अपडेटनुसार दोन आठवड्यांच्या आत त्याला हॉस्पिटलमधून (Hospital) डिस्चार्ज मिळू शकतो, आणि त्यानंतर तो दोन महिने मैदानात येण्यासाठी तयारी सुरू करू शकतो.

टाईम्स ऑफ इंडियाच्या (Times of India) रिपोर्टनुसार, पंतच्या उजव्या गुडघ्याच्या लिगामेंटवर (Ligaments of the knee) दोन यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्याची शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांना आशा आहे की पंतच्या लिगामेंटची बाकीची दुखापत स्वतःच बरी होईल. एवढेच नाही तर पंत यांना लवकरच रुग्णालयातून डिस्चार्जही (Discharge) मिळू शकतो, असेही या अहवालात सांगण्यात आले आहे. पंतला २ आठवड्यांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो. यानंतर त्याचा पुनर्वसन आराखडा तयार केला जाईल. जर सर्व काही ठीक झाले तर तो दोन महिन्यांत त्याचे पुनर्वसन सुरू करू शकतो. असे झाल्यास त्याचे मैदानावर पुनरागमन झटपट होईल आणि कदाचित ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी तो बरा होईल आणि स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्यासाठी पुरेसा फिट होईल.

मिळालेल्या माहितीनुसार, ऋषभ पंतला दोन आठवड्यांत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो. यानंतर बीसीसीआयकडून त्याचा रिहॅब चार्ट (Rehab chart) तयार केला जाईल. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “तो किती दिवसांत मैदानात परतू शकेल, याबाबत अद्याप स्पष्ट काहीच सांगता येणार नाही. पंतला माहित आहे की, त्याला काऊन्सलिंग सत्रातूनही जावं लागेल. अशा परिस्थितीत त्याला मैदानात परतण्यासाठी आणखी ४ ते ६ महिने लागू शकतात.”

हे ही वाचा:

दावोसमध्ये राज्यासाठी १ लाख ३७ हजार कोटींचे करार, मुख्यमंत्रांची माहिती

बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्रावरून राजकारण तापलं, राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss