spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शुभमन गिलने ठोकली षटकारांची हॅट्रिक, न्यूझीलँड संघासमोर ठेवले ३५० धावांचे लक्ष्य

भारताने ५० ओवरमध्ये ८ गाडी गमावून ३४९ धावा केल्या आणि आता भारताने न्यूझीलँड संघासमोर ३५० धावांचे आव्हान ठेवले आहे.

भारत आणि न्यूझीलँड यांच्यातील ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हैद्राबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडत आहे. या सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकत भारत संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने ५० ओवरमध्ये ८ गाडी गमावून ३४९ धावा केल्या आणि आता भारताने न्यूझीलँड संघासमोर ३५० धावांचे आव्हान ठेवले आहे.

शुभमन गिलने झळकावले द्विशतक…

सलामीवीर शुभमन गिलने शानदार फलंदाजी करत, आपल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्याच्या कारकिर्दीतील पाहिले द्विशतक झळकावले आहे. त्याने १४९ चेंडूंचा सामना करत २०८ धावा केल्या आहेत. त्याने आपल्या आजच्या खेळीत एकूण १९ चौकार आणि ९ षटकार मारले आहेत. गिलने ४९व्या ओवरमध्ये लगादार षटकार मारत आपले द्विशतक पूर्ण केले.

संयम राखत भारताने केली सुरुवात…

शुभमन गिल आणि रोहित शर्माने सामन्याची सुरुवात करत पहिल्या विकेट आधी ६० धावांची भागीदारी केली. दरम्यान १३व्या ओवरमध्ये ३८ चेंडूत ३४ धावा काढून रोहित शर्मा बाद झाला. यावेळी विराट कोहलीची फलंदाजीही जरा फिकी पडली, विराट १० चेंडूत ८ धावा करून बाद झाला. ईशान किशननेसुद्धा १४ चेंडूत ५ धावा करत स्वस्तात डाव आटोपला. सूर्यकुमार यादवने गिलसोबत ६५ धावांची भागीदारी केली आणि सूर्यकुमार २९ ओवरला बाद झाला. शुभमन गिलने हार्दिक पांड्यासोबत मिळून ७४ धावा केल्या तर वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर खास कामगिरी करू शकले नाही. ५०व्या ओवरच्या दुसऱ्या चेंडूवर गिल आठवा खेळाडू म्हणून बाद झाला. न्यूझीलँड खेळाडू फिलिप्स याने त्याची विकेट घेतली. न्युइनलँड संघाकडून शीप्ली आणि डेनिल मिचेल यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या तर लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर आणि मिचेल सेंचर यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

हे ही वाचा:

पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोटनिवडणूक जाहीर, २७ फेब्रुवारीला होणार मतदान

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्राजक्ता माळीचा हटके लूक, फोटो पाहून व्हाल आश्चर्यचकित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss