spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

“तर मी स्वतःला फाशी लावून घेईन” लैंगिक शोषणाच्या आरोपांवर बृजभूषण सिंहांनी दिली प्रतिक्रिया

अशी कोणतीही घटना घडलेली नाही आणि लैंगिक छळाची घटना तर घडलेलीच नाही.

दिग्गज महिला कुस्तीपटू विनेश फोगट आणि साक्षी मलिक यांनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. गंभीर आरोप केल्यानंतर ब्रिजभूषण शरण सिंह यांनी आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, अशी कोणतीही घटना घडलेली नाही आणि लैंगिक छळाची घटना तर घडलेलीच नाही. असे जर काही घडले तर मी स्वतःला फाशी लावून घेईन.”

पुढे ते म्हणाले की, गेल्या दहा वर्षांपासून त्यांना फेडरेशनशी संबंधित काही अडचण आली नाही का? नवीन नियम आणि कायदे आणले जातात तेव्हा समस्या समोर येतात. महासंघाने कोणत्याही खेळाडूला त्रास दिला असे कोणी म्हणू शकेल का? ते म्हणाले की, लैंगिक छळ हा मोठा आरोप आहे. माझे नाव यात ओढले गेले असताना मी असे कसे वागू शकतो? मी चौकशीसाठी देखील तयार आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

देशातील अनेक नामवंत कुस्तीपटू भारतीय कुस्ती महासंघाविरोधात आंदोलन करत आहेत. बुधवारी या आंदोलनात विनेश फोगटही सहभागी झाली होती. ती म्हणाली की प्रशिक्षक महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ करतात. त्यानंतर ब्रिजभूषण यांच्यावरही लैंगिक छळाचे आरोप करण्यात आले आहेत. विनेश फोगट व्यतिरिक्त आणखी काही प्रसिद्ध कुस्तीपटू या घटनेचा विरोध करत आहेत. प्रशिक्षक महिलांचा छळ करतात आणि फेडरेशनच्या काही आवडत्या महिला प्रशिक्षकही त्रास देत असल्याचा आरोप विनेश फोगट यांनी केला आहे. मुलींचा लैंगिक छळ होत असून डब्ल्यूएफआयच्या अध्यक्षांनीही अनेक मुलींचा छळ केला आहे. विनेश फोगट इथेच थांबली नाहीत. ती पुढे म्हणाले की, आमच्या वैयक्तिक आयुष्यातही ढवळाढवळ केली जाते. ऑलिम्पिकमध्ये आमच्याकडे फिजिओ किंवा प्रशिक्षक नव्हता. आमचे शोषण होत आहे. याविरुद्ध आम्ही आवाज उठवला, त्यामुळे आता धमकावण्याचे काम सुरू आहे.

हे ही वाचा:

ज्योतिरादित्य सिंधियांनी इंडिगो प्रकरणात केला तेजस्वी सूर्याचा बचाव म्हणाले, “चूकून इमर्जन्सी एक्झिट उघडली”

मोदींच्या दौऱ्यामुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत केले बदल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss