spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राष्ट्रवादीने केला अमृता फडणवीसांवर आरोप, सरकारी बंगल्यात बनवला रील…

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस त्यांच्या नवीन गाण्यामुळे सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. अमृता फडणवीस यांचं “आज मैं मूड बना लिया” हे गाणं काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आलं.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस त्यांच्या नवीन गाण्यामुळे सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. अमृता फडणवीस यांचं “आज मैं मूड बना लिया” हे गाणं काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या गाण्यात त्यांच्या नृत्याची झलकही पाहायला मिळाली. अमृता यांच्या नव्या गाण्याला प्रेक्षकांनी पसंती दर्शविली. अवघ्या काही तासांतच त्यांच्या या नव्या गाण्याला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले. परंतु आता सोशल मिडियावर त्यांची एक रील देखील तितकीच तुफान व्हायरल होत आहे. आणि त्याच्या या रील वर आता राष्ट्रवादीने आक्षेप घेतला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riyaz Aly (@riyaz.14)

 अमृता फडणवीस यांनी रील स्टार रियाझ अली याच्याबरोबर “आज मैं मूड बना लिया” या गाण्यावर रील व्हिडीओ बनवला आहे. रियाझ अलीसह या व्हिडीओमध्ये त्या गाण्याची हूक स्टेप करत डान्स करताना दिसत आहेत. रियाझ अली आणि अमृता फडणवीस या दोघांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसेच त्यांच्या या व्हिडिओ वर अनेक कंमेंट्स देखील येत आहेत. तसेच या व्हिडीओवर कमेंट करत नेटकरी अमृता फडणवीसांना ट्रोल करत आहेत. आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या हेमा पिंपळे यांनी अमृता फडणवीसांच्या या रीलवर आक्षेप घेतला आहे.

तसेच ‘एबीपी माझा’ या वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी अमृता फडणवीसांच्या या रीलबाबत भाष्य केलं. त्या म्हणाल्या, “अमृता फडणवीस यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन रीयाझ अलीबरोबरचा एक रील व्हिडीओ शेअर केला आहे. तो रील व्हिडीओ सरकारी बंगल्यात शूट करण्यात आला आहे. अमृता फडणवीसांनी सरकारी बंगल्यात रील बनवण्यासाठी सरकारकडून लेखी अधिकृत परवानगी घेतली होती का? हेदेखील त्यांनी रीलप्रमाणे व्हायरल करावं”. तसेच अमृता फडणवीस यांना पुरविण्यात आलेल्या वाय दर्जाच्या सुरक्षेवरुनही हेमा पिंपळे यांनी आक्षेप घेतला आहे. त्या म्हणाल्या आहेत की, “अमृता फडणवीस यांना सरकारने अगोदरच बेकायदेशीरपणे वाय दर्जाची सुविधा दिलेली आहे. वास्तविक पाहता, वाय दर्जाची सुविधा ही केवळ संविधानिक पदाच्या व्यक्तीला दिली जाते. तरीही सत्तेचा गैरवापर करत अमृता फडणवीसांना अशा प्रकारची सुरक्षा देण्यात आली आहे”, असं त्या म्हणाल्या.

हे ही वाचा:

पप्पू म्हणणं दुर्देवी, आरबीआयचे माजी गव्हर्नरकडून राहुल गांधी यांची स्तुती

मोदींच्या सभेसाठी विद्यापीठाची भिंत तोडल्यामुळे विद्यार्थी झाले आक्रमक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss