spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

PM Modi Mumbai Visit Live, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा, जाणून घ्या प्रत्येक अपडेट

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई दौऱ्यावर आहेत. तसेच आज पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Mod) हस्ते मुंबईतील अनेक विकास कामांना चालना मिळेल.

Narendra Modi Maharashtra Visit Live : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई दौऱ्यावर आहेत. तसेच आज पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Mod) हस्ते मुंबईतील अनेक विकास कामांना चालना मिळेल. तसेच पूर्ण झालेल्या विकास कामांचे उद्घाटन देखील होणार आहे. त्याचबरोबर काही विकास कामांचं लोकार्पणही करण्यात येणार आहे. त्यानंतर मुंबईत बीकेसी (BKC Ground) मैदानावर एका विराट सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्य म्हणजे या सभेत मोदी काय बोलणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेलं आहे.

सत्तांतरानंतर पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. अवघ्या काही क्षणात नरेंद्र मोदी हे मुंबईत येणार आहेत. यादरम्यान पंतप्रधान मोदी ३८,८०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार आहेत. तसेच मुंबई मेट्रो रेल्वे मार्ग 2A आणि 7 चे उद्घाटन देखील करतील. त्याच बरोबर पंतप्रधान मोदी मुंबईतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्प आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासाची पायाभरणी करणार आहेत. त्याच सोबत 20 व्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या दवाखान्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे.

तसेच नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या प्रत्येक अपडेट जाणून घेऊया.

  •  पंतप्रधान नरेंद्र मोदी गुंदवली मेट्रो स्थानकात दाखल
  •  नरेंद्र मोदींनी मुंबईकरांना घातली साद. तुम्ही दहा पावलं चला मी अकरा पावलं चालेन.
  •   पंतप्रधान नरेंद मोदींच्या भाषणाला मराठीतून सुरवात
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई मेट्रोच्या मेट्रो २-अ मेट्रो ७ या दोन मार्गांचे रिमोटचे बटण दाबून उद्घाटन करण्यात आले. तसेच वीस बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचं लोकार्पणही करण्यात आले.
  • सहा महिन्यातच विरोधकांना धडकी भरली आहे. शिंदेंनी सध्याच्या सरकारवर टीका करणाऱ्यांना जोरदार उत्तर दिले.
  • जगभरात मोदींच्या नावाचा डंका, एकनाथ शिंदे
  • गेल्या अडीच वर्षात काय झाले त्यावर बोलणार नाही, एकनाथ शिंदे
  • फडणवीसांच्या काळात मेट्रोच्या कामांना गती मिळाली, एकनाथ शिंदे
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी मोदींमुळे महाराष्ट्रातील विकास कामम सुलभ होत असल्याचे म्हणाले. आजचा दिवस सुवर्णअक्षरात लिहण्याासारखा असून, गेमचेंजर समृद्धी महामार्गाचं लोकार्पण मोदींच्या हस्ते झाले. मोदींकडून महाराष्ट्राला विशेष अपेक्षा असल्याचेही शिंदे म्हणाले. काहींना मेट्रोचे उद्घाटन मोदींंच्या हस्ते होऊ नये असे वाटतं होते.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील लोकप्रिय नेते , देवेंद्र फडणवीस
  • २० वर्षे मुंबई पालिकेवर ज्यांनी राज्य केलं आहे त्यांनी केवळ फिक्स डिपॉझिट केली आहे आणि स्वतःची खिशे भरली आहेत. – देवेंद्र फडणवीस
  • बी.के.सी मधल्या कार्यक्रमाला सुरवात झाली आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषणांमधून स्वागत केलं. देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
  • भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मुंबई विमानतळावर देखील दाखल जगले आहेत
  • नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विमानतळावर दाखल झाले आहेत.
  • अवघ्या काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत दाखल होणार आहेत.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी या मेट्रो रेल्वेमधून प्रवास करणार आहेत.
  • पंतप्रधान मोदी यांच्या बीकेसी येथील सभेच्या ठिकाणी बॅनर्सची कमान कोसळली. या घटनेत एक पोलीस जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
  • भारतचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच स्वागत करण्यासाठी मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल उपस्थित आहेत.

Latest Posts

Don't Miss