spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पराग म्हेत्रेने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला

वर्ल्डस केटलबेल स्पोर्ट्स इंडिया फेडरेशनच्यावतीने पोर्तुगाल मध्ये झालेल्या स्पर्धेसाठी गौरांग आमडेकर, राजराजेश्वरी राजाराम या स्पर्धकांची निवड झाली होती.

केटलबेल हा मुळ रशियन राष्ट्रीय खेळ. पोर्तुगालमध्ये झालेल्या वर्ल्ड केटलेबल स्पोर्ट चँम्पियनशिपमध्ये कोथरूड च्या पराग म्हेत्रे ने रौप्य पदक मिळवले. वर्ल्ड केटलेबल स्पोर्ट चँम्पियनशिपमध्ये रौप्य पदक मिळवणारा पराग हा परिलाच भारतीय खेळाडू आहे. केटलबेल या व्यावसायिक क्रीडा स्पर्धेत ७४ किलो वजन गटात कोथरुड मधील पराग म्हेत्रे याने रौप्य पदक मिळवत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. क्लीन अँड जर्क प्रकारात ३० मिनीटात न थांबता ३२ किलो वजन उचलून स्पर्धेत जागतिक स्तरावर दुस-या क्रमांकाचे स्थान मिळवले आहे. त्यामुळे केटलबेल या खेळात पराग ने जगामध्ये दुस-या क्रमांक पटकावला आहे. वर्ल्डस केटलबेल स्पोर्ट्स इंडिया फेडरेशनच्यावतीने पोर्तुगाल मध्ये झालेल्या स्पर्धेसाठी गौरांग आमडेकर, राजराजेश्वरी राजाराम या स्पर्धकांची निवड झाली होती.

माणसाची सहनशक्ती पाहणारा व ताकद आजमावणारा हा खेळ आहे. पोर्तुगालमध्ये वर्ल्ड केटलबेल स्पोर्ट चॅम्पियनशिपमध्ये परागने भारतासाठी रौप्य पदक मिळवले आहे. क्लीन अँड जर्क इव्हेंटमध्ये ३० मिनिटे न थांबता ३२ किलो वजन २३५ वेळा उचलून त्याने व्यावसायिक स्पर्धेत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे. पोलंडने सुवर्ण तर स्पेनने कांस्य पदक मिळवले. केटलबेल हा मुळचा रशियन राष्ट्रीय खेळ असून या खेळाचा आणि त्यामुळे येणा-या फिटनेस बाबत भारतभर प्रचार करण्याचे काम पराग म्हेत्रे करतो.

आपल्याला मिळालेल्या यशाबद्दल पराग म्हणाला; ”मला मार्शल आर्ट येते. इंजिनियर म्हणून २००५ ला अमेरिकेत गेलो होतो त्यावेळेस फिटनेसच्या निमित्ताने माझी या खेळाशी ओळख झाली. कमी जागेत करू शकणा-या या व्यायाम प्रकाराची मला आवड निर्माण झाली. भारतातील २० राज्यात आम्ही हा खेळ पोहचवला. इतर राज्यातही हा खेळ पोहोचवण्याचे आमचे ध्येय आहे.” या आंतरराष्ट्रीय खेळासाठी वर्ल्ड केटलबेल स्पोर्ट फेडरेशनने परागची आंतरराष्ट्रीय पंच” म्हणून निवड केली आहे. पंच म्हणून काम करण्याची संधी मिळालेला तो एकमेव भारतीय आहे.

Latest Posts

Don't Miss