spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणासारखे गंभीर आरोप नंतर मनसेची पहिली प्रतिक्रिया

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (BJP MP Brijbhushan Sharan Singh) यांच्यावर लैंगिक शोषणासारखे (sexual abuse) गंभीर आरोप करत कुस्तीपटूंनी जंतरमंतर येथे आंदोलन केले. आता या प्रकरणावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (Maharashtra Navnirman Sena) सुद्धा या पहिली प्रतिक्रिया येत आहे. गुंड प्रवृत्तीच्या बृजभूषण सिंहांची हकालपट्टी करा, अशी पहिली मागणी मनसे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी केली. ते माध्यमांशी बोलत होते. तसंच भाजपच्या महिला आघाडीने यावर आपलं मत मांडलं पाहिजे, अशी मागणीही मनसेने केली.

अयोध्या (Ayodhya) दौऱ्यासाठी निघालेल्या राज ठाकरे (Raj Thackeray) यांना बृजभूषण सिंह यांनी रोखलं होतं. उत्तर भारतीयांची (North Indians) माफी मागा मगच अयोध्येत पाय ठेवा अशी आक्रमक भूमिका बृजभूषण यांनी घेतली होती. त्यानंतर बृजभूषण हे महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी पुण्यात आले होते. त्यावेळी मात्र मनसेने विरोध केला नव्हता. आता मात्र मनसेने आक्रमक भूमिका घेतली.

ते पुढे म्हणाले की, जेव्हा नवीन नियम आणि कायदे आणले जातात तेव्हा समस्या समोर येतात. संपावर बसलेल्या कुस्तीपटूंनी ऑलिम्पिकनंतर कोणत्याही राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतलेला नाही. कोणत्याही प्रकारचा छळ झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. तसे झाले तर मी स्वतःला फाशी देईन. यात कोणा बड्या माणसाचा हात आहे, तर कुणा बड्या उद्योगपतीचा हात आहे, असेही ते म्हणाले. हे षडयंत्र आहे.

हे ही वाचा:

नरेंद्र मोदींच्या हस्ते अनेक प्रकल्पांचे लोकार्पण

PM Narendr Modi Mumbai Visit Live, डबल इंजिन सरकारमध्ये आता देशाचा विकास होतो, नरेंद्र मोदी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss