spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

देवळाली गावात शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या मुलाने केला गावात गोळीबार, परिसरात तणावाचे वातावरण निर्माण

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाला चांगलाच वेग आल्याचं दिसून येत आहे.काही महिन्यांपूर्वीच म्हणजेच जून २०२२ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अचानक केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं होत .

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाला चांगलाच वेग आल्याचं दिसून येत आहे.काही महिन्यांपूर्वीच म्हणजेच जून २०२२ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अचानक केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं होत . एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आणि शिवसेनेचे ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले. तसेच अनेकांनी शिंदे गटात प्रवेश केला. या बंडांनंतर शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात अनेकदा वाद झाले आहेत. काल दि १९ जानेवारी च्या (गुरुवारी) सायंकाळी असाच एक वाद पुन्हा दिसून आला आहे. नाशिक जिल्ह्यातील देवळाली (Deolali) गावात खळबळजनक घटना घडली आहे. या घडलेल्या घटनेमुळे देवळाली परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील देवळाली गावात काल शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray Group) आमनेसामने येत त्यांच्यात मोठा वाद झाला. या संपूर्ण वादात शिंदे गटाचे पदाधिकारी सूर्यकांत लवटे (Suryakant Lavte) यांच्या मुलाने थेट बंदूक काढत हवेत गोळीबार (Firing) देखील केला.

मागील महिन्यात माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे यांच्यासह नाशिकमधील अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या देवळाली गाव परिसरात पारावर सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षपदावरुन चर्चा सुरु असतानाच शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या समर्थकांमध्ये वाद झाले. यावेळी स्वप्निल सूर्यकांत लवटे याने हवेत गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज येताच परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, भीतीपोटी व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद केली होती. तसेच हवेत गोळीबार केल्याचं समजताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह मोठा फौजफाटा इथे तैनात करण्यात आला होता. दरम्यान पोलिसांनी संशयित स्वप्निल लवटेला ताब्यात घेतले असून उपनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्निल लवटे हा शिंदे गटाचे नाशिक जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजू लवटे यांचा पुतण्या देखील आहे.

शिवसेनेमधील बंडानंतर गणपणी विसर्जनादरम्यान देखील ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. यावेळी देखील यांच्यात मोठे वाद झाले होते. आणि तेव्हा सदा सरवणकर यांनी गोळीबार केला असा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली होता. सरवणकर यांच्याविरोधात १५ सप्टेंबर रोजी शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आणि अखेर हि गोळी आमदार सदा सरवणकर यांच्याच पिस्तुलातून सुटल्याचं समोर आले.

हे ही वाचा:

मुंबई मेट्रो 2A आणि 7 झाले उद्घाटन, आजपासून प्रवासासाठी खुल्या होणाऱ्या मेट्रोची सविस्तर माहिती घ्या जाणून

ठाकरे गटाची ऑफर स्वीकारणार का? पंकजा मुंडे म्हणाल्या, माझ्या मनात…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss