spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राशी भविष्य 19 जुलै 2022

मेष : संतसंगाचा लाभ मिळेल. आर्थिक बाबतीत ओढाताण होण्याची सेवा करणे. मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्यावर आपले निर्णय मते लादू नका. दिलेल्या वचनाची पूर्तता करण्याचा प्रयत्न करा. कार्यालयातील वरिष्ठ तसेच सहकारी यांच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य वाढेल. उद्येग व्यसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरू शकेल.

वृषभ : खाण्यापिण्या बद्दलची रुची वाढण्याची शक्यता आहे. अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. प्रियजनांच्या भेटीगाठी होतील. कार्यालयीन कामकाज मार्गी लावताना तुमच्यावर ताणतणाव मळभ असेल. महत्वाच्या विषयाला चालना मिळण्यासाठी तुमच्या विचाराचे योगदान कामी येईल.

मिथुन : इतरांना आधार देण्याचा विचार परोपकाराची परवली असेल. आज आपण आपणा स्वतःला समजण्याची आवश्यकता आहे. समाजातील घटनाक्रमाचे साडपडसाद तुम्हाला विचलित करू शकतील.

कर्क : सुखाने हुरळून जाऊ नका आणि विवंचनेच्या काळात आपण कणखर बनतो याचे विस्मरण देखील होऊ देऊ नका. आज तुम्हाला आपल्या भाऊ-बहिणीच्या मदतीने धन लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबियांच्या गरजांना प्राथमिकता द्या. त्यांच्याबरोबर सुखदुःखाच्या प्रसंगात सामील व्हा. प्रवासातून नवीन संबंध प्रस्थापित होण्याची शक्यता आहे.

सिंह : इतरांसोबत सहकार्याची भूमिका घेतल्याने आत्मोन्नती साधता येईल. तुमचा निर्धार आणि मेहनत याची नोंद समाजही घेईल. नवे मित्र जोडाल. जुन्या विषयावर वादविवाद उफाळून येऊ शकतात. तुमच्या योजना बारगळविण्याचा प्रयत्न होऊ शकतो. हितशत्रूंच्या कारवाया नुकसानकारक ठरू शकतात.

कन्या : अनपेक्षित वाढणाऱ्या खर्चाची तरतूद करावी लागेल. तुम्हाला आज आर्थिक हानी होऊ शकते. व्यवसायात आपल्या स्पर्धकांच्या तोडीस तोड राहण्यासाठी आपल्या विचारांची स्पष्टता उपयोगी पडेल. त्याचबरोबर भूतकाळातील विचारातील गोंधळ नाहीसा होण्यास मदत होईल.

तुला : तुमच्यातील कला गुणांना तसेच सुप्त गुणांना वाव मिळेल. सामाजिक प्रथा परंपरांचा अभिमान राखण्याचा प्रयास केला जाईल. तुमचे हसतमुख वागणे कुटुंब जीवन प्रकाशमान करतील. तोलामोलाच्या व्यक्तींशी व्यवहार करताना तुमचे ज्ञान तुमच्या व्यक्तीमत्त्वाला वेगळीच धार देईल.

वृश्चिक : शारीरिक व्यायाम करण्याकडे कल राहील. नवनवीन विषयाचा अभ्यास वाढविण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल. कमिशन-लाभांश- किंवा मानधन याद्वारे फायदे मिळतील. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख-समृद्धी व शांतता नांदेल.

धनु : अति घाई कामाची नाही. धीर – संयम हे गुण अमलात आण्याची मानसिकता ठेवावी. आपले निंरतर प्रयत्न आणि प्रासंगिक विषयाला समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. घरगुती प्रश्न आणि प्रलंबित घरगुती कामं पूर्ण करण्यासाठी लाभदायक दिवस. प्रेमामध्ये अनावश्यक मागण्यांसाठी झुकू नका.

मकर : कुटुंबजनांच्या उपद्रवी मानसिकतेमुळे विचलित होऊ शकाल. कोर्ट कचेरीतील कामकाज अथवा खटले अशा विषयात आज तुम्हाला विजय मिळू शकतो आणि तुम्हाला धन लाभ ही होऊ शकतो. सर्वसाधारणपणे लाभदायक दिवस आहे. कार्यालयातील वरिष्ठ तसेच सहकारी यांच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य वाढेल.

कुंभ : कलाक्रीडा विषयात उन्नत पाऊल उचलण्यासाठी आज अनुकूल वातावरण बनेल. अनेक विषयातील विविधांगी संधी चालून येतील. संतती सौख्य लाभेल. तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. नवीन कामकाजाबाबत तज्ज्ञ लोकांशी चर्चा विमर्ष केल्याने अधिक उन्नती साधू शकाल.

मीन : आरोग्यासाठी योग्य उपचार मिळतील. अर्थार्जनासाठी अधिक संधी उपलब्ध होतील. कुटुंबाच्या अर्थी आयव्ययाचा ताळेबंद आखावा लागेल. भावनिक अडथळे अडचणी निर्माण होऊ शकतात. व्यावसायिकदृष्ट्या तुम्ही केलेली गणिते फलदायी ठरतील. प्रकल्प वेळेवर पूर्ण करू शकाल. नवीन प्रकल्प हाती घेण्यासही ही योग्य वेळ आहे.

– रविंद्र भगवान पाठक गुरुजी ठाणे ८१०८२६६६७२  

Latest Posts

Don't Miss