आता कोणत्याही क्षणी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा ही होऊ शकते. ही निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्ष आता जोरदार तयारीला लागले आहेत. भाजपाने तर मुंबई पालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी सभा, बैठका यांच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षातील नेते एकमेकांवर चिखलफेक उडवताना दिसत आहेत. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे (Maharashtra Navnirman Sena leader Sandeep Deshpande) यांनी ठाकरे गटावर एक गंभीर आरोप केला आहे. आणि त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. २३ जानेवारी रोजी करोना काळातील सर्वात मोठा घोटाळा समोर आणणार आहे, असे संदीप देशपांडे म्हणाले आहेत.
वीरप्पन गॅंग चा करोना काळातला मोठा घोटाळा सोमवार दिनांक 23जानेवारी ला उघड करणार पुराव्या सहीत
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 21, 2023
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एक पत्रकार परिषद घेत मोठा खळबळजनक दावा केला आहे. त्यामुयले चर्चाना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. यावेळी बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, “एक व्यक्ती शाखेत आली. त्या व्यक्तीने काही कागदपत्रं आणि पेन ड्राईन शाखेत दिली. त्या व्यक्तीचे नाव समजू शकले नाहीत. कारण आपण कार्यालयात नसताना एक व्यक्ती कागदपत्र आणि पेन ड्राईव्ह (Pen Drive) ठेवून गेल्याचा माहिती संदीप देशपांडे यांनी दिली आहे. मात्र तो पेन ड्राईव्ह मी पहिला. कागदपत्रं देखील पाहिली. या पेन ड्राईव्हमध्ये कोरोना (Corona) काळात मुंबई महापालिकेत (Mumbai Municipal Corporation) झालेल्या घोटाळ्यांचे पुरावे असल्याचा दावा देशपांडे यांनी केला आहे. म्हणजेच विरप्पन गँगने करोना काळात मुंबईची लूट केली. या लुटीचे ढळढळीत पुरावे या पेन ड्राईव्हमध्ये आहेत. सोमवारी दि २३ जानेवारी रोजी आम्ही हे सगळं जाहीर करणार असल्याचं संदीप देशपांडेंनी सांगितलं. तसेच पोलिसांत तक्रारही देणार आहोत,” असं देखील संदीप देशपांडे म्हणाले आहेत.
त्याचसोबत संदीप देशपांडे यांनी या संदर्भात ट्विट करत देखील माहिती दिली आहे. या ट्विट मध्ये त्यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद म्हणजे वीरप्पन गॅंगच्या उलट्या बोंबा असल्याचा टोला संदिप देशपांडेंनी लागवालाय. वीरप्पन गॅंगचा कोरोना काळातला मोठा घोटाळा पुराव्यासहीत सोमवारी दिनांक २३ जानेवारीला उघड करणार असल्याचे देशपांडेंनी म्हटलं आहे. त्यामुळे आता सोमवारी दि २३ जानेवारी रोजी संदीप देशपांडे नेमकी काय भूमिका मांडणार किंवा काय पुरावे सादर करणार ते पाहणं नक्कीच महत्वाचं असेल.
हे ही वाचा:
Mumbai Mega Block, मुंबईकरांनो उद्या लोकलने प्रवास करायचा असेल तर आजच करा नियोजन
जैन मंदिराच्या कार्यक्रमासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यात दाखल