spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ठाकरे गटासह विरोधकांना मोठा धक्का, परभणीतील ४० सरपंचाचा शिंदे गटात प्रवेश

काही महिन्यापूर्वी शिवसेनेत मोठा बंड हा झाला होता. शिवसेनेतील मोठा नेता म्हणजेच एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारला आणि शिवसेनेतून काढता पाय घेतला. तेव्हा झालेले बंडाचे पडसाद अजूनही राज्यात दिसून येत आहेत.

काही महिन्यापूर्वी शिवसेनेत मोठा बंड हा झाला होता. शिवसेनेतील मोठा नेता म्हणजेच एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारला आणि शिवसेनेतून काढता पाय घेतला. तेव्हा झालेले बंडाचे पडसाद अजूनही राज्यात दिसून येत आहेत. अनेक जिल्यामध्ये ठाकरे गटातील अनेक नेते, कार्यकर्ते हे दुसऱ्या पक्षामध्ये जाताना दिसून येत आहे. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे नाशिक जिल्हा आहे. नाशिक जिल्ह्यातून शिवसेनेच्या ठाकरे गटाला मोठमोठे धक्के बसत गेले आहेत. अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. तर आता परभणीत ठाकरे गटासह विरोधकांना देखील मोठा धक्का हा बसला आहे.

महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या राज्यांमधून ठाकरे गटासह विरोधकांना मोठं मोठे धक्के हे बसत आहेत. आता पुन्हा एकदा विरोधकांना परभणी जिल्ह्यात मोठा धक्का हा बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत परभणी जिल्ह्यातील (Parbhani District) पाथरी तालुक्यातील तब्बल ४० सरपंच, उपसरपंच, सभापती, पंचायत समिती सभापती, ग्रामपंचायत सदस्य, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या फेसबुक वरून स्वतः एक पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे त्या पोस्ट मध्ये ते म्हणाले आहेत की, यात प्रामुख्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस आणि अपक्ष सरपंचांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुंजाभाऊ टाकळकर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रमोद पाटील यांचाही यात समावेश आहे. याशिवाय माजी नगराध्यक्ष मोईन अन्सारी, माजी उपनगराध्यक्ष युसूफ अन्सारी, नगरसेवक नामदेव चिंचाणे, शंकर चिंचाणे, परभणीचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील, मावळा संघटनेचे जिल्हाध्यक्ष आकाश नवघरे, परभणी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गोपाळ साखरे पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मानवत पंचायत समिती सभापती शिवाजी उक्कलकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. याप्रसंगी त्यांचे स्वागत करित या सर्वांना भावी सामाजिक तसेच राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे १५९३ सरपंच निवडून आले होते. त्यात अजून ४० जणांची भर पडली आहे. तुम्ही पक्षावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू तसेच तालुक्याच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करू असे सांगून सर्वांना आश्वस्त केले. यासमयी खासदार भावनाताई गवळी, आमदार संजय शिरसाट, आमदार बालाजी कल्याणकर, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव संजय म्हशीलकर, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव सुशांत शेलार, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या प्रवक्त्या सौ.शीतल म्हात्रे, परभणीतील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते सईद खान तसेच सर्व आणि सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे ही वाचा:

‘तो फलंदाजी करतानाही विकेट घेत होता…’ सचिनने माजी गोलंदाजाची उडवली खिल्ली

Mhada Lottery 2023, लवकरच मुंबईत होणार हक्काचं घर, तब्बल ८ हजार घरांची सोडत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss