spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘Kantara 2’ वर ऋषभ शेट्टीचा शिक्का, कांतारापेक्षा जास्त असणार चित्रपटाचं बजेट

पुढील वर्षी एप्रिल किंवा मे पर्यंत हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो, असे विजय किरगंदूर यांनी सांगितले.

अभिनेता ऋषभ शेट्टीचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘कांतारा’ला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळाले. आता या चित्रपटाचा प्रीक्वल ‘कांतारा २’ लवकरच येणार आहे. ‘कांताराची निर्मिती कंपनी होम्बल फिल्म्सने याला दुजोरा दिला आहे. ‘कंतारा २’मध्ये ऋषभ शेट्टीही मुख्य भूमिकेत दिसणार असून दिग्दर्शनाची जबाबदारीही तो सांभाळणार आहे. दिग्दर्शक ऋषभ शेट्टी या चित्रपटच्या सिक्वेलवर नव्हे तर प्रीक्वलवर काम करत आहे. म्हणजे चित्रपटाची कथा पुढे जाणार नाही, उलट तिची कथा अधिक विस्तारली जाईल.

‘कांतारा’ प्रोडक्शन कंपनी होम्बल फिल्म्सचे संस्थापक आणि निर्माते विजय किरगंदूर यांनी सांगितले आहे की ऋषभ शेट्टी सध्या ‘कांतारा २’ च्या स्क्रिप्टवर काम करत आहे. यासोबतच तो या चित्रपटाची उर्वरित तयारीही करत आहे. या चित्रपटाचे शूटिंग काही महिन्यांत सुरू होणार आहे. विजय किरगंदूर यांनी ‘कांतारा २’च्या बजेटबद्दलही सांगितले आणि ते म्हणाले की, ‘कांतारा’च्या प्रीक्वलचे बजेट ‘कांतारा’पेक्षा जास्त असेल. होम्बल स्टुडिओने नुकतेच पुढील पाच वर्षांत चित्रपट आणि वेब सीरिजवर ३० अब्ज रुपयांची गुंतवणूक करण्याबाबत सांगितले होते. अशा परिस्थितीत ‘कांतारा २’ देखील चांगलीच बाजी मारणार हे उघड आहे.

विजय यांनी असेही सांगितले की, ‘ऋषभ सध्या या विषयावर संशोधन करत आहे. चित्रपट’ आणि त्याच्या लेखन साथीदारांसह तो कर्नाटकच्या किनारी जंगलातही गेला. चित्रपटाच्या काही भागाच्या चित्रीकरणासाठी पावसाळी हवामानाची गरज असल्याने टीम जूनपासून प्रीक्वल शूट करण्यासाठी तयारी करत आहे. पुढील वर्षी एप्रिल किंवा मे पर्यंत हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो, असे विजय किरगंदूर यांनी सांगितले. यासोबतच हा चित्रपट पॅन इंडिया स्तरावरही रिलीज करण्याची तयारी सुरू आहे.

‘कांतारा २’च्या कलाकारांबद्दल बोलताना विजय किरगंदूर म्हणाले की, काही नवीन स्टार्सचाही या चित्रपटात समावेश करण्यात येणार आहे. पण, सध्यातरी आमचा प्रयत्न तो ‘कांतारा’च्या शैलीत करण्याचा आहे. ‘कांतारा’ गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये रिलीज झाला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने यशाचा झेंडा रोवला. याआधी तो कन्नड भाषेत रिलीज झाला होता, पण प्रेक्षकांमध्ये त्याची क्रेझ पाहून तो हिंदी, तमिळ, तेलगू आणि मल्याळममध्येही रिलीज करण्यात आला होता.

हे ही वाचा:

जम्मूच्या नरवाल परिसर बॉम्बस्फोटाने हादरला, ३० मिनिटांच्या अंतराने झाले दोन स्फोट, ७ जण जखमी

तारीख ठरली! ‘या’ दिवशी होणार वंचित-शिवसेना युती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss