spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

दैनिक ‘सामानाच्या’ जाहिरातीमधून शिंदे गटावर हल्लाबोल

सध्या महाराष्ट्रामध्ये राजकारण चांगलंच तापल्याच दिसून येत आहे. उद्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena chief Balasaheb Thackeray) यांच्या जयंती निमित्त दैनिक सामनामध्ये अनेक जाहिराती छापून येत आहे. पण राजकीय वर्तुळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख प्रवक्ते, खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) आणि त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत (MLA Sunil Raut) यांची सामनामधील जाहिरात सध्या चांगलीच वायरल होतांना दिसत आहे. जाहिरातीमध्ये साहेब मी गद्दार नाही… असा मजकूर ठळक अक्षरात छापण्यात आला आहे. मजकूरासोबत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो छापण्यात आला आहे. राऊत बंधुंनी या जाहिरातीच्या माध्यमातून शिंदे गटावर निशाणा साधल्याने आता शिंदे गट त्यावर काय प्रतिक्रिया देतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हिंदुह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांनी शिंदे गटावर चांगलाच निशाणा साधला आहे. राऊत बंधुंनी मुखपत्र ‘सामना’च्या मुखपृष्ठावर बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करणारी जाहिरात दिली आहे. उद्या बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असल्याने आजच ही जाहिरात देण्यात आली आहे. त्यावर साहेब मी गद्दार नाही, असा मजकूर ठळक अक्षरात छापून शिंदे गटाला डिवचले आहे. त्यामुळे ही जाहिरात चांगली व्हायरल होताना दिसत आहे.

राऊत बंधुंनी या जाहिरातीतून शिंदे गटाला डिवचले आहे. या जाहिरातीत शिंदे गटाला झोंबणारा गद्दार हा शब्द वापरण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे गट आता त्यावर कसा पलटवार करतो, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. २३ जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray), माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), तेजस ठाकरे (Tejas Thackeray), खासदार संजय राऊत आणि इतर ठाकरे गटाचे नेते शिवाजी पार्कातील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर येऊन अभिवादन करतील. यावेळी शिंदे गटाचे मंत्री किंवा आमदार अभिवादनासाठी येतात का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे ही वाचा:

राष्ट्रवादी विधानसभा निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडी घेणार ‘हा’ मोठा निर्णय

पंतप्रधानांवरील माहितीपट हटवण्याचे यूटय़ूब, आणि ट्विटरला केंद्रसरकारने दिले आदेश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss