spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ChatGPT शी स्पर्धा करणार गूगलचे फिचर, लवकरच होणार AI चॅटबोट लाँच

गूगल कंपनी आता चॅटजीपीटीशी स्पर्धा करण्यासाठी नवीन आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) चॅटबॉट तयार करण्यात व्यस्त आहे.

चॅटजीपीटी गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून सतत चर्चेत आहे. हा आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा (AI) चॅटबॉट वापरकर्त्यांना त्यांच्या प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन वेड लावत आहे. एका प्रश्नाच्या उत्तरात, ते गूगलसारखे १० लिंक देत नाही परंतु सरळ अचूक उत्तर देते. आगामी काळात चॅटजीपीटी गुगलला टक्कर देईल आणि इंटरनेट विश्वात आपली पावले चांगलीच रोवेल, असेही बोलले जात आहे. दुसरीकडे, गूगल कंपनी आता चॅटजीपीटीशी स्पर्धा करण्यासाठी नवीन आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) चॅटबॉट तयार करण्यात व्यस्त आहे. कंपनीचे म्हणणे आहे की त्यांचा नवीन चॅटबॉट चॅटजीपीटी पेक्षा कितीतरी पटीने चांगला परफॉर्मन्स देईल.

गुगलच्या या चॅटबॉटचे नाव ‘स्पॅरो’ असेल असे सांगण्यात येत आहे. कंपनीचे सीईओ डेमिस हसाबिस यांनी सांगितले की, या चॅटबोटचा ‘खासगी बीटा’ २०२३ मध्ये रिलीज केला जाऊ शकतो. सीईओने सांगितले की ती सर्व वैशिष्ट्ये स्पॅरो एआय चॅटबॉटमध्ये उपलब्ध होणार आहेत, जी ओपनएआय कंपनीच्या चॅटजीपीटीमध्ये उपलब्ध नाहीत. यामध्ये शिकण्याचा अनुभव आणखी वाढवण्यासाठी स्त्रोत द्धृत करण्याची क्षमता देखील समाविष्ट आहे. मात्र, आता त्याच्या लॉन्चिंगला थोडा वेळ लागू शकतो.

डीपमाइंड म्हणजे काय?

डीपमाइंड अनेक दिवसांपासून गूगलसाठी AI चे कामकाज पाहत आहे. २०२१० मध्ये ब्रिटीश कंपनी डीपमाइंड लाँच करण्यात आली होती. त्यानंतर २०१४ मध्ये गुगलने ती विकत घेतली आणि त्याचे नाव बदलून Google DeepMind असे ठेवले. गेल्या वर्षी, स्पॅरो या AI संकल्पनेला प्रूफ-ऑफ-कॉन्सेप्टच्या रूपात सादर करण्यात आले होते . त्यावेळी या फीचरला डायलॉग एजंट म्हणून म्हणण्यात आले होते, जे असुरक्षित आणि चुकीच्या उत्तरांचा धोका कमी करण्याचे काम करते.

चॅटजीपीटी म्हणजे काय?

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लाँच करण्यात आलेला, चॅटजीपीटी हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर काम करणारा चॅटबॉट आहे. प्रश्न विचारल्यावर, हा चॅटबॉट गूगलपेक्षा चांगली उत्तरे देतो. चॅटजीपीटी मानवी स्पर्शाने तुमच्या प्रश्नांची उत्तरे देते. तुमच्यासाठी मित्राप्रमाणे कविता, निबंध लिहिते आणि वेगवेगळ्या विषयांवर मित्रासारखे सल्लाही देते. गूगल तुम्हाला एका प्रश्नाच्या उत्तरात १० लिंक देते, परंतु चॅटजीपीटी फक्त एकच योग्य उत्तर देऊन तुमच्या सर्व समस्या सोडवते.

हे ही वाचा:

संभाजी महाराज धर्मरक्षक, शिवेंद्रराजे भोसले यांचा अजित पवारांवर टीका

ससुराल सिमर का फेम अभिनेत्री लवकरच होणार आई, सोशल मीडियाद्वारे दिली गुड न्यूज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss