spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

संभाजी महाराज धर्मरक्षक, शिवेंद्रराजे भोसले यांचा अजित पवारांवर टीका

पुण्यात सकल हिंदू समाजाकडून जनआक्रोश (Hindu Janakrosh Morcha) आयोजित केलेल्या मोर्चाला मोठी गर्दी जमली होती. पुण्यातील लाल महाल पासून निघालेला मोर्चा छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) पुतळ्याजवळ येऊन थांबला. तेलंगणा चे भाजप आमदार राजा भैया (Raja Bhaiya) आणि संत तुकाराम महाराज यांचे वंशज शिवाजीराव मोरे (Shivajirao More), शिरीष मोरे हे उपस्थितीत होते, छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचे वंशज भाजप आमदार शिवेंद्रराजे राजे भोसले (Shivendraraj Raje Bhosale) सुद्धा उपसत होते. यावेळी शिवेंद्रराजे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आणि यावेळी त्यांनी संभाजी महाराज हे ‘धर्मरक्षकच’ आहेत असं त्यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणाले, आतापर्यंत आपण जो इतिहास वाचला. त्यात छत्रपती संभाजी महाराजांची ओळख ‘धर्मवीर’ म्हणूनच इतिहासात केली गेली आहे, त्यामुळं यावरती चर्चा होऊ नये, असं म्हणत भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. आज पुण्यात हिंदू जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यात शिवेंद्रराजे भोसले सहभागी झाले आहे. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

सगळीकडे भीतीचं वातावरणं निर्माण झालं आहे. हिंदू समाजात देखील भीतीचं वातावरण आहे. ही भीती कमी करण्यासाठी हा मोर्चा काढला आहे. केंद्रात भाजपचं सरकार आहे. शिवाय मोदीही आहेत. राज्यात देखील भाजपचं सरकार आहे. त्यामुळे मोर्चाची दखल घेण्यात येईल. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. या स्थापनेच्या वेळी धर्माचं रक्षक करावं हादेखील मुद्दा होता. या मोर्चातून आम्हाला कोणालाही विरोध करायचा नाही आहे. आम्ही फक्त आमचा धर्म जपण्याचा प्रयत्न करत आहोत, असंही शिवेंद्रराजे म्हणाले.

हे ही वाचा:

ससुराल सिमर का फेम अभिनेत्री लवकरच होणार आई, सोशल मीडियाद्वारे दिली गुड न्यूज

ब्रिजभूषण सिंह यांनी बाळगलं मौन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss