spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मध्यरात्री २ वाजता शाहरूख खानने केला आसामच्या मुख्यमंत्र्यांना फोन, पहा नेमकं झालं काय

बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा त्याच्या पठाण (Pathan) चित्रपटामुळे चांगलाच वादात अडकला आहे.अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पण चित्रपटातील बेशरम रंग (Besharam Rang) या गाण्याच्या प्रदर्शनावर अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. कारण गाण्यातील चित्रीकरणावर धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आक्षेप केला गेला होता. पठाण (Pathan) चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अगदी दोन दिवस बाकी आहेत आणि त्याआधीच शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) हा चित्रपट अडचणीत सापडला आहे. कारण आसाममध्ये पठाण चित्रपटाला चांगलाच विरोध दर्शवला गेला आहे. त्यामुळे अभिनेता शाहरुख खान याने मदतीसाठी थेट आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांना चक्क रात्री २ वाजता फोन लावला आहे.

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्या पठाण (Pathan) चित्रपटाचा आसाममधून खूप मोठ्या प्रमाणात विरोध केला जातो आहे. आसाम मध्ये तर पठाण (Pathan) चित्रपटाचे ज्या सिनेमागृहात प्रदर्शन होणार होते. त्या सिनेमागृहांची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणावर पत्रकारांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांना प्रश्न विचारला असता हिमंता बिस्वा शर्मा (Himanta Biswa Sarma) यांनी “शाहरुख खान कोण आहे? असे उत्तर पत्रकारांना दिले आहे. ” हिमंता बिस्वा शर्मा (Himanta Biswa Sarma)हे पुढे म्हणाले की राज्यातील जनतेने हिंदी नव्हे तर आसामी भाषेतील चित्रपटांची काळजी करावी ” असे हिमंता बिस्वा शर्मा (Himanta Biswa Sarma) यांनी सांगितले आहे.

तर आता हिमंता बिस्वा शर्मा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावर ट्विट केले आहे की “बॉलिवुड अभिनेते शाहरुख खान यांनी रात्री दोन वाजता फोन कॉल केला. रात्री दोन वाजता आमच्यात फोनवरून चर्चा झाली. गुवाहाटी येथे त्यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान झालेल्या घटनेबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम राज्य सरकारचे असल्याचे म्हणत मी त्यांना आश्वासित केले आहे. आम्ही याबाबत चौकशी करू तसेच आगामी काळात अशा घटना घडणार नाहीत, याची खबरदारी घेऊ,” असे हिमंता बिस्वा शर्मा यांनी त्यांच्या ट्विट मध्ये लिहिले आहे. गुवाहाटीमधील सिनेमागृहांची तोडफोड करण्यात आली होती. या सिनेमागृहांमध्ये पठाण चित्रपटाचे प्रदर्शन होणार होते. ही तोडफोड बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती. तसेच या कार्यकर्त्यांनी शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाचे पोस्टर देखील जाळले होते.

हे ही वाचा:

ChatGPT शी स्पर्धा करणार गूगलचे फिचर, लवकरच होणार AI चॅटबोट लाँच

संभाजी महाराज धर्मरक्षक, शिवेंद्रराजे भोसले यांचा अजित पवारांवर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss