spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पुण्यात लव्ह जिहाद विरोधात हिंदू जनआक्रोश मोर्चा

धर्मांतर (conversion), गोहत्या (cow slaughter) आणि लव जिहाद (Love Jihad) यासाठी कडक कायदे करावेत. त्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज (Dharmaveer Chhatrapati Sambhaji Maharaj) यांचा बलिदान दिवस धर्मवीर दिन म्हणून साजरा करावा.या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्यावतीने हिंदू जन आक्रोश मोर्चाला लाल महाल येथून सुरवात झाली. हा मोर्चा डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत होता.

आमदार शिवेंद्रराजे भोसले (MLA Shivendraraje Bhosale), तेलंगणाचे आमदार राजा भैया (Telangana MLA Raja Bhaiya), तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजीराव मोरे (Shivajirao More), शिरीष मोरे (Shirish More), धनंजय देसाई (Dhananjay Desai) यांचा यात विशेष सहभाग झाले होते. शहरातील राजकीय पक्ष, हिंदुत्ववादी संघटना, व्यापारी, गणेशोत्सव मंडळेदेखील या मोर्चात सहभागी झाले होते. या मोर्चात महिला आणि युवकांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग दिसला. विश्व हिंदू परिषदचे किशोर चव्हाण, पतित पावन संघटनेचे स्वप्निल नाईक (Swapnil Naik), श्री शंभू चरित्र अभ्यासक नीलेश भिसे (Nilesh Bhise), राजे शिवराय प्रतिष्ठानचे महेश पवळे सहभागी झाले होते.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज (Chatrapati Sambhaji Maharaj) यांचा बलिदान दिवस धर्मवीर दिन म्हणून साजरा करावा. प्रेमाच्या नावाखाली सुरु असणाऱ्या लव्ह जिहाद (Love jihad) विरोधात कायदा व्हावा. धर्मांतर होऊ नये, त्यासाठी कायदे करण्यात यावेत. गोहत्या थांबवण्यात यावी.या सगळ्यांबात कायदे करावे आणि त्याची कठोर अंमलबजावणी करावी. लाल महाल येथून मोर्चा सुरु झाला आणि डेक्कन परिसरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत गेला. या मार्गावर भगवे झेंडे लावण्यात आले होते . त्याशिवाय मोठ्या प्रमाणात बॅनर्सदेखील लावण्यात आले होते. रस्त्यांच्या दुतर्फा भगवी टोपी परिधान करुन हिंदू एकवटले होते. विविध प्रकारच्या घोषणा देत मोर्चाला सुरुवात झाली होती.

हे ही वाचा:

जीवाश्मशास्त्रज्ञांना आले यश, भारतातील नर्मदा खोऱ्यात सापडली डायनासॉरची २५६ अंडी

‘बिग बॉस मराठी’ फेम विकास सावंत करतोय ऑलिम्पिकची तयारी, म्हणाला, माझी ताकद…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss