spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ललित प्रभाकरचा हटके अंदाज म्हणतोय, तुज्या स्टेटसला, लाव फोटो माझा

तर अभिनेता ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) देखील आपल्या खास मित्राला ‘तुज्या स्टेटस ला, लाव फोटो माझा’ असं म्हणत फुल ऑन राडा एक गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

मित्र हे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा एक अविभाज्य असतो. मराठी, हिंदी अशा विविध चित्रपटांमधून नेहमीच आपण मैत्रीचे महत्त्व पहिले आणि ऐकले आहे. तर अभिनेता ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) देखील आपल्या खास मित्राला ‘तुज्या स्टेटस ला, लाव फोटो माझा’ असं म्हणत फुल ऑन राडा एक गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. आपल्या मैत्रीसाठी ललित काय ‘टर्री’गिरी करणार हे येत्या १७ फेब्रुवारीला ‘टर्री’ (Tarri) या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

राष्ट्रीय पारितोषिक विजेते महेश रावसाहेब काळे यांनी यांनी ‘टर्री’ या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. अशातच ललित प्रभाकर त्याच्या टर्री या चित्रपटाचे तुझ्या स्टेटसल लाव फोटो माझा हे गाणे घेऊन आला आहे. ललितने सिनेमातील नव्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिलं आहे,”तुझ्या स्टेटसल लाव फोटो माझा…आता लाव ताबडतोब… भाई आलंय आपलं पहिलं गाणं…”लाव फोटो माझा”.

 

View this post on Instagram

 

A post shared by @lalit.prabhakar

 नाद करायचा नाय, आपल्या दोस्ताचा … तुज्या स्टेटसला, लाव फोटो माझा.. या क्षितीज पटवर्धन याने लिहिलेल्या या धमाल गाण्याला अवधूत गुप्ते, मनीष राजगिरे यांनी स्वरबद्ध केले आहे. प्रफुल्ल कार्लेकर-स्वप्नील गोडबोले यांचा संगीतसाज या गाण्याला लाभला आहे. या गाण्यातून दोन जीवाभावाच्या मित्रांची घट्ट मैत्री दिसून येते. ललित प्रभाकरचं ‘लाव फोटो माझा’ हे गाणं सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होत आहे. ललितच्या व्हिडीओवर नाद करायचा नाय, आपल्या दोस्तीचा, एकदम तडका, टर्री, भावा शुभेच्छा अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

‘टर्री’ चित्रपटात ललित प्रभाकर सोबत अभिनेत्री गौरी नलावडे दिसणार असून शशांक शेंडे, अनिल नगरकर, आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे छायांकन अमोल गोळे यांनी केले असून संकलन श्रीराम बडवे, प्रवीण जहागीरदार यांचे आहे. एजाज गुलाब हे या चित्रपटाचे अॅक्शन डिरेक्टर आहेत. १७ फेब्रुवारीला ‘टर्री’ चित्रपट प्रदर्शित होणार असून चित्रपटाचे वितरण पॅनोरमा स्टुडिओ करणार आहे.

हे ही वाचा:

बाळासाहेब ठाकरे यांच्या चित्र अनावरणानंतर तरी त्यांना त्यांची चूक कळूदे, आदित्य ठाकरेंचा शिंदेगटावर हल्लाबोल

त्यांना डायपर घातले पाहिजे, हिंदू जन आक्रोश मोर्चातून थेट पवारांवर हल्लाबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss