spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

केएल राहुल आणि अथिया शेट्टी आज लग्नबंधनात अडकणार, जाणून घ्या कधी आणि कसा पार पडणार लग्नसोहळा

लग्नाचे विधी पूर्ण झाल्यावर आज संध्याकाळी ६ च्या सुमारास हे जोडपे मीडिया समोर येणार आहे. या लग्नाला जवळपास १०० माणसे उपस्थित असण्याची शक्यता आहे.

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर केएल राहुल आणि सुनील शेट्टी यांची मुलगी आणि बॉलीवूड अभिनेत्री अथिया शेट्टी हे आज (२३ जानेवारी) लग्नबंधनात अडकणार आहेत. अथिया आणि केएल राहुल आज संध्याकाळी ४ वाजता कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नाचे विधी पूर्ण झाल्यावर आज संध्याकाळी ६ च्या सुमारास हे जोडपे मीडिया समोर येणार आहे. या लग्नाला जवळपास १०० माणसे उपस्थित असण्याची शक्यता आहे. खंडाळा येथील सुनील शेट्टी यांच्या फार्महाऊसवर हे लग्न होणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या कुटुंबाने ‘नो फोन पॉलिसी’चा निर्णय घेतला आहे. लग्नाला उपस्थित असलेल्या पाहुण्यांना सोशल मीडियावर फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट करण्यास मनाई करण्यास आली आहे. तसेच लग्नात येताना मोबाईल फोन न घेऊन येण्याची विनंती देखील पाहुण्यांना करण्यात आली आहे. तसेच येत्या काही दिवसात या जोडप्याचे मुंबईत भव्य रिसेप्शन देखील होऊ शकते.

सुनील शेट्टी यांच्या खंडाळा फार्महाऊसवर रविवारी प्री – वेडिंग सेलिब्रेशनला सुरुवात झाली. याचदरम्यान या जोडप्याने एक संगीत सोहळा देखील आयोजित केला होता. असे सांगितले जात आहे की लग्नानंतर, हे जोडपे एप्रिल महिन्यात भव्य रिसेप्शन आयोजित करेल. ज्यामध्ये अनेक बॉलीवूड सेलिब्रिटीसना आणि क्रिकेटविश्वातील दिग्जांना आमंत्रित केले जाईल. अथिया आणि केएल राहुलचे लग्न हे दाक्षिणात्य पद्धतीने पार पडणार आहे.

हे ही वाचा:

Balsaheb Thackeray Jayanti 2023, बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील अखेरचा ‘राजकीय संवाद’ काय होता हे तुम्हाला माहित आहे का ? घ्या जाणून

आज होणार ठाकरे गट आणि वंचितच्या युतीची घोषणा, ‘या’ ठिकाणी करणार युतीची घोषणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss