spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Balasaheb Thackeray Birth Anniversary, मोदी असले तरीही महाराष्ट्रात बाळासाहेबांशिवाय मतं मिळू शकत नाही, उद्धव ठाकरे

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आज ९७ वी जयंती आहे. हा दिवस सर्व शिवसैनिक तरी साजरा करतातच पण त्या साबोत संपूर्ण देशभरात आज बाळासाहेबांची जयंती मोठ्या प्रमाणत साजरा केला जातो. त्याच सोबत आज ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही गटाकडून अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आज एककीकडे विधान भवनाच्या पाचव्या मजल्यावरील मध्यवर्ती सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे.तर दुरीकडे ठाकरे गटांकडून मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात मेळाव्याचं आयोजन केलं आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलाच हल्लबोल केला आहे.

यावेळी भाषणाची सुरवात करतानाच उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि सत्ताधाऱ्यांवर चांगलाच हल्लाबोल हा केला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, गद्दार हे खोक्यांनी विकले जाऊ शकतात किंवा घेतले जाऊ शकतात. परंतु गर्दी हि विकत घेता येऊ शकत नाही. तसेच ते पुढे म्हणाले, नेत्याला एखादी माहिती पडते आणि पक्षप्रमुखाला पडत नाही असं थोडीना होतं? संजय तुला पोलंडचा पंतप्रधान भेटला, मला तर थेट अमेरिकेचे अध्यक्ष भेटले. मला म्हणाले की, मी आज इथे आलो, उद्या मी भाजपात चाललोय. कारण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या घरावर रेड पडली आणि कागदपत्रे सापडली. मग लगेच आपल्या इथल्या खोकेविरांनी सांगितलं की, अरे तू कसं जगणार? न झोपेचा पत्ता, न कसलं काही. भाजपात ये किंवा मिंधे गटात ये, बघ सगळं मस्त. त्यामुळे ते उद्या भाजपात किंवा मिंदे गटात गेले तर आश्चर्य वाटायला नको, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.

तसेच पुढे उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेकर यांच्या युतीवर भाष्य केलं आहे, तेव्हा ते म्हणाले, आज वारसाचे आणि विचारांचे नातू एकत्र आले आहेत. तसेच पुढे उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली. यावर हे उशीरा सुचलेले शहाणपण आहे. खरेतर हा महाराष्ट्रद्वेष्टा माणूस आहे त्याला हाकलूनच दिले पाहिजे अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भगतसिंग कोश्यारी यांच्यावर हल्लाबोल केला. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकर, महात्मा फुले यांचा अपमान होऊनही गप्प बसणारे बाळासाहेबांचा शिवसैनिक असू शकतो का? ही सगळी नाटके संपवण्याची वेळ आलीय. हे सगळे दगड आहेत. भाजपा दगडाचा वापर करतेय. काम झाल्यावर तेही टाकून जाणार असं त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

राज्यपाल भवन हे भाजप भवन झालेलं, राज्यपालांच्या राजीनाम्यावर नाना पटोलेंनी दिली प्रतिक्रिया

Balasaheb Thackeray यांच्या तैलचित्राचे विधीमंडळात थोड्याच वेळात अनावरण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss