spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अखेर झाले बाळासाहेबांच्या तैलचित्राचे अनावरण

तैलचित्राचे अनावरण होण्याआधीच हा कार्यक्रम सत्ताधारी आणि विरोधी यांच्या आरोप प्रत्यारोपांच्या भोवऱ्यात अडकला होता.

आज शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची ९७ वी जयंती आहे. हा दिवस शिवसैनिक मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात.मात्र, यावेळी शिवसेनेचे दोन गट झालेले असताना. ठाकरे गटाकडून वेगळा आणि शिंदे गटाकडून वेगळा अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तैलचित्राचे अनावरण होण्याआधीच हा कार्यक्रम सत्ताधारी आणि विरोधी यांच्या आरोप प्रत्यारोपांच्या भोवऱ्यात अडकला होता. मात्र अखेर बाळासाहेब ठाकरे यांच्या या तैलचित्राचे अनावरण झाले आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त या तैलचित्राच्या अनावरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले आहे. हा तैलचित्र सोहळा विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. तसेच यावेळी बाळासाहेब ठाकरेंचे हे तैलचित्र साकारणारे चित्रकार किशोर नादावडे यांचाही सत्कार यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.

या सत्कार सोहळ्याला, राजकीय वर्तुळातील अनेक दिग्गज नेते भवनात उपस्थित होते. यामध्ये विरोधी आणि सत्तधारी अशा सर्व नेत्यांचा समावेश होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्ष नेते अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यसह अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आहे. तसेच या सोहळ्याला अनेक कलाकार मंडळींनी देखील हजेरी लावली आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमाला जाणं टाळलं आहे. या कार्यक्रमाला सरकारकडून सर्वपक्षीय मान्यवरांना आमंत्रित केलं होतं. यामध्ये विरोधी पक्षाचे नेते अजित पवारांबरोबरच ठाकरे कुटुंबियांनाही या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र ठाकरे कुटुंबीय या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत हे स्पष्ट झालं आहे. अजित पवार विधानभवनामध्ये या कार्यक्रमासाठी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास पोहोचले आहेत. उद्धव ठाकरेंची अनुपस्थिती आणि त्याचवेळी राज ठाकरेंची उपस्थितीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत.

हे ही वाचा:

Balasaheb Thackeray, तैलचित्रावर “शिवसेना पक्षप्रमुख हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे” असा उल्लेख करावा, अजित पवारांची मागणी

Balasaheb Thackeray Birth Anniversary, मोदी असले तरीही महाराष्ट्रात बाळासाहेबांशिवाय मतं मिळू शकत नाही, उद्धव ठाकरे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss