spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Balasaheb Thackeray, तैलचित्रावर “शिवसेना पक्षप्रमुख हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे” असा उल्लेख करावा, अजित पवारांची मागणी

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आज ९७ वी जयंती आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आज ९७ वी जयंती आहे. हा दिवस सर्व शिवसैनिक तरी साजरा करतातच पण त्या साबोत संपूर्ण देशभरात आज बाळासाहेबांची जयंती मोठ्या प्रमाणत साजरा केला जातो. त्याच सोबत आज ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही गटाकडून अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आज एककीकडे ठाकरे गटांकडून मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात मेळाव्याचं आयोजन केलं आहे. तर दुरीकडे विधान भवनाच्या पाचव्या मजल्यावरील मध्यवर्ती सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार देखील उपस्थित होते.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण सोहळ्याचं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, बाळासाहेबांचे विचार पुढे नेत असल्याचा दावा करत असताना जे पोटात, तेच ओठात, बोलणं एक आणि करणं एक, असे न करता बाळासाहेबांचे हे गुण आत्मसात आणण्याचा प्रयत्न आपण केला पाहीजे, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली. तसेच अजित पवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे एक मागणी केली आहे. आणि ते म्हणाले माहीत की, बाळासाहेबांना आज हिंदुहृदयसम्राट असं ओळखलं जातं, पण त्यांची खरी ओळख ही शिवसेनाप्रमुख अशी आहे असं मला वाटतं, त्यामुळे त्यांच्या तैलचित्रावर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असं लिहिण्यात यावं अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. स्व. बाळासाहेबांची जयंती अशी भव्य दिव्य स्वरुपात साजरी करण्याचा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे. देशाच्या स्वाभिमानासाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढणाऱ्या बाळासाहेबांचे तैलचित्र इथे लागत आहे ही महाराष्ट्रासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब असल्याचे ते म्हणाले.

पुढे अजित पवार म्हणाले, “स्व. बाळासाहेब ठाकरे हिंदूहृदयसम्राट आहेतच, त्याबद्दल कुणाच्याच मनात शंका नाही. पण ते हिंदू धार्जिणे होते, हे अर्धसत्य आहे. बाळासाहेबांना हिंदू, मुस्लीम, शीख, बौद्ध, जैन अशा सर्व धर्मीयांबद्दल आस्था आणि आदर होता. १९७२-७३ मध्ये शिवसेनेने रा.सु. गवई यांच्याबरोबर युती केली होती. मुंबई महानगरपालिकेत जागा कमी पडल्या असता मुस्लीम लीगचाही पाठिंबा घेतला होता. सुधीर जोशींना महापौर केले होते. भीमशक्ती-शिवशक्तीला एकत्र आणण्याचे काम बाळासाहेबांनी केले होते. आणीबाणीच्या काळात शिवसेनेने काँग्रेसला पाठिंबा दिला होता. प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा दिला होता.” “बाळासाहेब तसे पाहिले तर राजकारणी नव्हते. त्यांचे जीवन खुल्या पुस्तकासारखे आहे. असं देखील अजित पवार म्हणाले आहेत

हे ही वाचा:

मोदींची शिवसेना म्हणत संजय राऊतांनी शिंदे गटावर साधला निशाणा

Balasaheb Thackeray Birth Anniversary, मोदी असले तरीही महाराष्ट्रात बाळासाहेबांशिवाय मतं मिळू शकत नाही, उद्धव ठाकरे

Governor Bhagat Singh Koshyari, कोण आहेत भगतसिंग कोश्यारी ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss