spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाला गुजरातमध्ये समर्थन, पहा नेमकं काय झालं

बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा त्याच्या पठाण (Pathan) चित्रपटामुळे चांगलाच वादात अडकला आहे. अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण हा आगामी चित्रपट उद्या प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पण चित्रपटातील बेशरम रंग (Besharam Rang) या गाण्याच्या प्रदर्शनानंतर अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. कारण गाण्यातील चित्रीकरणावर धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आक्षेप केला गेला होता.तर बऱ्याच ठिकाणी या चित्रपटाच्या विरोधात बरीच तीव्र निदर्शनं झाली. बऱ्याच हिंदू संघटनांनी या चित्रपटाच्या गाण्यावर आक्षेप घेतला, हा चित्रपट बॉयकॉट करायची देखील जोरदार मागणी होत होती. तसेच बजरंग दल (Bajrang Dal) चित्रपटाच्या विरोधात देशभरामध्ये प्रचंड आक्रमक झालेलं पाहायला मिळाले आहे. पण गुजरातमध्ये बजरंग दलाची वेगळीच भूमिका पाहायला मिळाली आहे.

बजरंग दल (Bajrang Dal) या संघटनेने संपूर्ण देशभरात पठाण चित्रपटाचा विरोधात केला आहे. त्याचबरोबर बजरंग दल (Bajrang Dal) सह आवेग हिंदू संघटना देखील पठाण चित्रपटाच्या विरोधात एकत्र आलेले पाहायला मिळाले आहे. याचे कारण म्हणजे पठाण चित्रपटाचे ‘बेशरम रंग’ (Besharam Rang) हे गाणं प्रदर्शित झालं. तेव्हा त्यात दीपिकानं घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून खूप वाद निर्माण झाला होता. या गोष्टीमुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत हिंदुत्ववादी संघटनांनी त्याला विरोध करायला सुरुवात केली. त्यानंतर हा वाद अधिकच चिघळला. या गाण्याला अनेक नेत्यांनी, संघटनांनी पठाण (Pathan) सिनेमाला विरोध करायला सुरुवात केली. तसेच अलीकडेच गुवाहाटीमध्ये देखील पठाण (Pathan) चित्रपट ज्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता. ती सिनेमागृहांमध्ये तोडफोड करण्यात आली होती. तर पुण्यामध्ये दिखील सिनेमा गृहाच्या बाहेरील पठाण चित्रपटाचे पोस्टर फाडण्यात आले होते. मुख्यतः या सर्व प्रकारात बजरंग दल कडून पुढाकार घेतला जात असल्याचे कळले आहे.

पण देशभरात सगळीकडे बजरंग दल (Bajrang Dal) कडून पठाण चित्रपटाच्या विरोधात पुढाकार घेतला जात असला तरीही गुजरात मध्ये बजरंगदालची वेगळीच भूमिका पाहायला मिळाली आहे. कारण विश्व हिंदू परिषद’ आणि ‘बजरंग दल’ या सन्घटना गुजरातमध्ये पठाण चित्रपटाचा विरोध करत नसल्याचे पाहायला मिळत आहे. कारण गुजरातच्या ‘विश्व हिंदू परिषद’चे प्रमुख अशोक रावल यांनी अधिकृत वक्तव्य जारी केलं आहे. ते म्हणाले “या चित्रपटाला बजरंग दलाकडून विरोध झाल्यावर सेन्सॉर बोर्डाने यातील अश्लील दृश्य आणि शब्द हटवले आहेत ही खूप चांगली बाब आहे. धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा आणि हिंदू समाजाचे मी अभिनंदंन करतो.” असे म्हणत अशोक रावल यांनी पठाण चित्रपटाचे समर्थन केले आहे.

हे ही वाचा:

Athiya Shetty – KL Rahul यांचा लग्न सोहळा थाटात झाला संपन्न, पहा खास फोटो

राज्यपाल आणि वाद, भगतसिंह कोश्यारींनी केलेली वादग्रस्त विधान कोणती घ्या जाणून

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss