spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Maghi Ganesh Jayanti 2023 माघी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने जाणून घ्या बाप्पाच्या जन्माची कथा

शास्त्रानुसार गणेश जयंतीचे व्रत करताना जर ही कथा ऐकली तरच उपासनेचे पूर्ण फळ मिळते.

गणेश जयंती २५ जानेवारी २०२३ रोजी आहे, या दिवशी भगवान गणेशाचा जन्म झाला अशी धार्मिक मान्यता आहे. गणेश जयंतीला विनायक चतुर्थी, माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील तिलकुंड चतुर्थी असेही म्हणतात. या व्रताच्या प्रभावाने संतानप्राप्तीची इच्छा पूर्ण होते अशी अनेकांची समजूत आहे. धार्मिक मान्यतेनुसार, माता पार्वतीने या दिवशी पुत्राच्या इच्छेने गणपतीला जन्म दिला होता. शास्त्रानुसार गणेश जयंतीचे व्रत करताना जर ही कथा ऐकली तरच उपासनेचे पूर्ण फळ मिळते.

गणेश जयंती व्रताची कथा

एकदा माता पार्वती स्नानासाठी गेली होती. त्यावेळी तिने तिच्या शरीरावरील हळदीच्या लेपापासून एका लहान बालकाचा पुतळा तयार केला आणि त्यानंतर त्या पुतळ्यामध्ये प्राण फुंकले. पुढे याच मुलाचे नाव गणेश ठेवण्यात आले. जेव्हा तो लहान बालकाचा पुतळा जिवंत झाला तेव्हा आई पार्वतीने गणेशाला दारावर पहारा ठेवण्याची आज्ञा दिली आणि ती आंघोळ करायला गेली. आंघोळ करून परत येईपर्यंत कोणालाही आत येऊ देऊ नकोस असे त्यांनी गणेशाला सांगितले. गणेशानेही आईची आज्ञा पाळायची म्हणून दारावर पहारा दयायला सुरुवात केली.

गणपती पूर्ण भक्तिभावाने दारावर पहारा देत होता. तेवढ्यातच महादेव माता पार्वतीला भेटायला आले पण बाल गणेशाने त्यांना आत जाण्यापासून रोखले. महादेव यांनी बाल गणेशाची समजूत घालण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला पण गणपती त्यांच्या मार्गातून बाजूला हटला नाही. त्यानंतर शेवटी महादेव रागावले आणि त्यांनी आपल्या त्रिशूळाने गणेशाचा शिरच्छेद केला. यानंतर महादेव आत गेले.

महादेवांनी माता पार्वतीला सांगितले की एक मुलगा त्याला आत जाऊ देत नव्हता आणि त्यामुळे त्यांनी त्याचा शिरच्छेद केला. हे ऐकून पार्वती माता खूप रागावली आणि दुःखीही झाली. देवी पार्वतीने महादेवांना सांगितले की तो कोणताही सामान्य बालक नसून माझा मुलगा गणेश आहे, त्यानंतर महादेवांना त्यांची चूक लक्षात आली आणि गणेशाच्या धडावर हत्तीचे डोके ठेवत त्यांनी गणपतीला पुन्हा जीवदान दिले आणि तेव्हापासून गणपतीला गजमुख म्हटले गेले.

भगवान गणेशाला समस्यानिवारक आणि अडथळे दूर करणारा देव म्हणतात. गणेश जयंतीचे व्रत केल्याने गणपती सर्व मनोकामना पूर्ण करतो. अनेक ठिकाणी माघ महिन्यातील गणेश चतुर्थी हा दिवस गणपतीचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला महाराष्ट्रात गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावेळी प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी देखील होते.

हे ही वाचा:

Maghi Ganesh Jayanti 2023, या शुभ मुहूर्तावर करा बाप्पाची पूजा विधी

Republic Day 2023, 26 JANUARY कसा साजरा केला जातो भारतीय प्रजासत्ताक दिन?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss