spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

फडणवीसांच्या आरोपावर दिलीप वळसे पाटलांचं प्रतिउत्तर

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं धुमश्चक्र होतांना दिसत आहे. तर आज भारतीय जनता पार्टीचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी माझा महाराष्ट्र माझा व्हिजन या कार्यक्रमात मोठा गौप्य्स्फोट केला आहे. या कार्यक्रमात बोलत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, ठाकरे सरकारच्या काळामध्ये मला जेलमध्ये (Jail) टाकण्याचं टार्गेट त्यावेळचे मुंबई सीपी संजय पांडे यांना दिलं होतं म्हणतं मोठा गौप्यस्फोट केला आहे. तर यावर तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी प्रतिउत्तर दिला आहे.

फडवीसांच्या आरोपानंतर तत्कालीन गृहमंत्री राहिलेले राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी हे सगळे आरोप फेटाळले आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना वळसे पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस काय बोलले हे मी ऐकलेलं नाही, मात्र त्यांनी जे आरोप केले आहेत तस कोणताही प्रकार महाविकास आघाडी सरकराच्या काळात झालेला नाही. मात्र देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडे असलेल्या माहितीच्या आधारे बोलले असतील, मात्र राज्य सरकारने असा कोणताही प्रयत्न केला नव्हता. अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ (My Maharashtra My Vision’) कार्यक्रमामध्ये ते बोलत होते तेव्हा ते म्हणाले कि, ठाकरे सरकारच्या काळामध्ये मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट त्यावेळचे सीपी संजय पांडे यांना दिलेलं. मी कोणताही काम केलं नव्हत, किंवा कोणती चूक केली नव्हती. त्यामुळे ते मला जेलमध्ये टाकू शकतील. त्यांचे प्रयत्न सफल झाले नाहीत असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.

हे ही वाचा:

देवेंद्र फडणवीस यांचे आरोप म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’, काँग्रेसचा हल्लाबोल

शिवसेना – वंचित यांच्या युतीबाबत आमच्या नाराजीचा प्रश्न येतो कुठे? का गैरसमज पसरवत आहात – अजित पवार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss