spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आई सेक्स वर्कर आहे म्हणून माझी मुलं सेक्स वर्कर होणार नाहीत, गौरी सावंत यांनीं सांगितलं मन हेलावून टाकणारा तो प्रसंग

या संस्थेमार्फत देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या मुलींचं त्या संगोपन करतात. नुकतंच गौरी सावंत यांनी झी मराठी वाहिनीवरी ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती.

तृतीयपंथी लोकांसाठी झटणाऱ्या, त्यांच्यासाठी सतत काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून गौरी सावंत यांची ओळख आहे. ‘उंच माझा झोका’ या पुरस्कारानेही त्यांचा सन्मान करण्यात आला. त्या ‘आजीचं घर’ ही संस्था चालवतात. या संस्थेमार्फत देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या मुलींचं त्या संगोपन करतात. नुकतंच गौरी सावंत यांनी झी मराठी वाहिनीवरी ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती.

तृतीयपंथ्यांच्या विकासासाठी आणि त्यांच्या हक्कासाठी झटणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये आवर्जून घेतलं जाणारं एक नाव म्हणजे गौरी सावंत. गौरी सावंत यांच्या या कामासाठी त्यांना ‘उंच माझा झोका’ या पुरस्काराने गौरविण्यात देखील आले आहे. त्या स्वतः ‘आजीचं घर’ हि संस्था चालवतात, जी देहविक्री करणाऱ्या स्त्रियांच्या मुलींचा सांभाळ करते. नुकतीच गौरी सावंत यांनी झी मराठीच्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात हजेरी लावली होती. ज्यात बोलत असताना त्यांनी एक हृदय हेलावून टाकणारा एक प्रसंग सांगितलं आहे. त्यांच्या या अनुभवासंबंधीचा व्हिडिओ झी मराठीने त्यांच्या ऑफिसिअल इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

या व्हिडीओमध्ये गौरी सावंत यांनी एक प्रसंग सांगितला. त्या म्हणाल्या, “मी एकदा मुंबईच्या रेड लाइट एरियामध्ये दुपारी सहज पाहणी करण्यासाठी गेले होते. महिलांच्या आरोग्याची तपासणी नियमित होत आहे की नाही हे पाहण्यासाठी मी तिथे गेले. तेव्हा एक प्रसंग घडला. तिथे २० ते २२ वर्षांची एक मुलगी होती. तिच्या बाजूला एका लहान मुलगी बसली होती. त्या लहान मुलीकडे बघून मी हसले. तेव्हा ती २० ते २२ वर्षांची मुलगी मला म्हणाली, तूला ही पाहिजे का? मी तिला विचारलं की, तू माझ्याकडे पाठवणार का? यावर तिने मला उत्तर दिलं की, जर हिला तुझ्याकडे पाठवलं नाही तर हीदेखील त्याच वळणावर जाणार.”

“तुम्ही मिरचीचं झाड पाहिलं असेल. मिरचीच्या झाडाला येणारी फुलं कधीच तिखट असतात. हे उदाहरण सांगायचा इतकाच हेतू की, आई सेक्स वर्कर आहे म्हणून माझी मुलं सेक्स वर्कर होणार नाहीत याची जबाबदारी मी घेतली. म्हणून ते माझं ‘आजीचं घर’”. गौरी सावंत त्यांच्या ‘आजीचं घर’ या संस्थेमार्फत अनेक मुलींना घडवत आहेत.

हे ही वाचा:

बादशहाला नागपूर न्यायालयात रहावे लागणार हजर, पहा काय आहे प्रकरण

अशोक चव्हाणांची मुलगी राजकारणात येणार? खुद्द अशोक चव्हाणांनी दिली माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss