spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Maghi Ganesh Jayanti 2023, माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने आमंत्रण पत्रिकेवर वापरा हे संदेश

माघी गणेश जयंती हा सण महाराष्ट्रातील सर्वात महत्वाच्या सणांमध्ये मोडला जातो. तसेच माघी गणेश जयंती ही भाद्रपद गणेश चतुर्थी प्रमाणेच अत्यंत उत्साहाने साजरी केली जाते. या वर्षीची माघी जयंती ही २५ जानेवारी म्हणजेच की उद्या साजरी केली जाणार आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्ष आपल्याला उत्साहाने कोणताही सण साजरा करता आला नाही. पण आता सर्व जण एकत्र मिळून हा सण समारंभ साजरा करू शकणार आहेत. यावर्षी तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना गणेश जयंती निमित्त घरी आलेल्या बाप्पाचं दर्शन ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने देण्यासाठी त्यांना आमंत्रित करू शकता . त्यासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रण पत्रिकांचा मेसेज फॉर्मेट देणार आहोत ते तुमच्या नक्कीच कामी येऊ शकणार आहे.तुम्ही जेव्हा पत्रिका तयार कराल त्यावेळेस पुढील संदेश तुमच्या पत्रिकेसाठी तुम्ही वापरू शकता.

सर्वप्रथम तुम्हाला गणपती बाप्पाच्या आगमनासाठीच्या आमंत्रण पत्रिकेत काही महत्वाच्या गोष्टी नमूद कराव्या लागतील. ते म्हणजे ऑनलाईन दर्शनाची लिंक- ऑनलाईन दर्शनाची वेळ- ऑफलाइन दर्शनाची आणि आरतीची वेळ या काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला नमूद कराव्या लागतील. या बरोबर पुढे काही संदेश दिले आहेत. त्यामधील तुम्हाला जे संदेश पसन्त पडतील ते संदेश तुम्ही तुमच्या गणपती बाप्पाच्या आमंत्रण पत्रिकेसाठी निवडू शकता.

१) सालाबादाप्रमाणे यंदाही आमच्याकडे माघी गणेशोत्सवानिमित्त श्रींचे आगमन होणार आहे तरीही आपण –/–/—- या दिवशी सहकुटुंब बाप्पाचं ऑनलाईन दर्शन घेण्यासाठी यावं ही विनंती.

२) या शुभ प्रसंगी आपल्या कुटुंबासमवेत यावे आणि भगवान गणेशाचा आशीर्वाद घ्यावा, जो —- पासून —- या कालावधी पर्यंत आमच्या घरी असेल, असे आपणास हार्दिक आमंत्रण पाठवत आहे. या पत्रिकेमार्फत आम्ही तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला भगवान गणेशाचे स्वागत आणि उत्सव साजरा करण्यासाठी आमंत्रित करत आहोत.

३) आपण सर्वांनी आपल्या घरी श्रीगणेशाचे स्वागत करूया आणि जीवनातील सर्व चिंता आणि संकटे दूर करण्यासाठी बाप्पाला प्रार्थना करूया. कृपया गणपतीचे दर्शन घ्यायला या आणि त्यांचे आशीर्वाद घ्या.

४) आपल्या घरात गणेशाचे आगमन झाल्यावर जो आनंद मिळतो त्याची जागा दुसरी कोणतीही भावना घेऊ शकत नाही. विघ्नहर्ता गणेशाचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण गणपती पूजेत सहभागी व्हावे ही विनंती.

५) माघी गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर, आम्ही तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना गणपतीच्या आशीर्वादाच्या आभाळाची ऊब अनुभवण्यासाठी आमच्या घरी आमंत्रित करत आहोत.

हे ही वाचा:

फडणवीसांच्या आरोपावर दिलीप वळसे पाटलांचं प्रतिउत्तरFollow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss