spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मंत्रिमंडळावरून दिल्लीमध्ये अमित शाहांसोबत खलबतं

सध्या महाराष्ट्रामध्ये राजकारण हे चांगलंच तापलं आहे. आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह (Union Minister for Cooperation Amit Shah) यांनी बोलाविलेल्या सहकार क्षेत्रासंबंधीच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil), केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Union Minister Raosaheb Danve), राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (National Secretary Pankaja Munde) एकत्र आल्याचे बोलले जात आहे. मात्र सहकार क्षेत्रासोबतच इतर सर्वच चर्चा होतील, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. इतर चर्चांमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची पद सोडण्याची इच्छा आणि मंत्रिमंडळाचा विस्तार हे विषय महत्त्वाचे आहेत.

शिंदे गटातील आमदारांमध्ये संजय शिरसाट (Sanjay Shirsat), योगेश कदम (Yogesh Kadam), प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik), संजय गायकवाड (Sanjay Gaikwad), सुहास कांदे (Suhas Kande), भरत गोगावले यांचा मंत्री म्हणून समावेश होऊ शकतो. अपक्ष आमदार बच्चू कडूही (MLA Bachu Kadu) यांचीही वर्णी लागू शकते. तर भाजपच्या गोटातून संजय कुटे (Sanjay Kute), आशिष शेलार (Ashish Shelar), गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar), राम शिंदे (Ram Shinde), नितेश राणे (Nitesh Rane), देवयानी फरांदे (Devyani Farande), प्रवीण दरेकर (Praveen Darekar) आदी नावांची मंत्रिपदासाठी चर्चा आहे.

आज दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका पार पडल्या. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या घरी सुरुवातील बैठक झाल्यानंतर अमित शाह यांच्या कार्यालयात बैठक झाली. राज्यातील सहकारी साखर कारखान्यांची स्थिती, सहकारी कारखान्यांचे नवे धोरण ठरविण्यासाठीची चर्चा आजच्या बैठकीत होऊ शकते. सहकाराचे नवे धोरण केंद्र सरकार आणणार आहे, त्याबाबतची चर्चा होण्याचीही शक्यता आहे. त्यासाठीच भाजपामधील सहकार क्षेत्राचे नेते रणजीतसिंह मोहिते पाटील, धनंजय महाडिक, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे यांची देखील या बैठकीला उपस्थिती होती.

हे ही वाचा:

बादशहाला नागपूर न्यायालयात रहावे लागणार हजर, पहा काय आहे प्रकरण

Maghi Ganesh Jayanti 2023, माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने आमंत्रण पत्रिकेवर वापरा हे संदेश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss