spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

shubhvivah शुभविवाह मालिकेतील कलाकारांचे झाले कौतुक, जीव धोक्यात घालून पूर्ण केले शूट

स्टार प्रवाह नेहमी मनोरंजनाची मेजवानी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. यावेळीही १६ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेली शुभ विवाह मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे.

स्टार प्रवाह नेहमी मनोरंजनाची मेजवानी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. यावेळीही १६ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेली शुभ विवाह मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. मालिकेचा टिझर प्रदर्शित झाला होता तेव्हाच प्रेक्षकांना मालिकेबद्दल उत्सुकता होती. त्यातील नवीन भूमिका बजावणारे कलाकार तसेच मालिकेची कथा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होती. पण आता मात्र हि मालिका प्रदर्शित झाली असून मालिकेबद्दल कौतुकास्पद बाब समोर आली आहे.

ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडली आहे.मालिकेतील वेगवेगळी वळणे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. या मालिकेत नुकताच एक प्रसंग चित्रित झाला आहे. या प्रसंगात असे दाखवले आहे कि, मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नात आकाश चक्क मंदिराच्या कळसावर चढतो. आपला जीव धोक्यात घालून इवल्याशा निरागस जीवाला वाचवण्याची आकाशची तगमग या प्रसंगात दिसून येत. मांजरीचा जीव धोक्यात आहे हे दिसताच आकाश धाडसाने कळसावर चढतो, मात्र त्यानंतर भीतीने तो कापू लागतो. हा संपूर्ण प्रसंग भूमीच्या लक्षात येताच भूमी कळसावर चढते व आकाश आणि मांजराचा जीव वाचवते. हा प्रसंग प्रदर्शित होताच प्रेक्षकांना खूप आवडला. तसेच चित्रपटांमध्ये असे स्टंट आपल्याला पाहायला मिळत असतात,पण मालिकांमध्ये हे फार कमी दिसून येते त्यामुळे या मालिकेचे कौतुक होत आहेत. सोबत काम करणाऱ्या कलाकारांचे सुद्धा कौतुक होत आहे. कारण उंचावर चढून सिन करणे हे सोपे काम नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

हा प्रसंग चित्रित करताना कलाकार आपले अनुभव सांगतात यशोमान आपटे (Yashoman Apte) म्हणजेच मालिकेतील आकाश म्हणतो कि सुरुवातीला खूप भीती वाटत होती. मात्र मालिकेतील संपूर्ण टीमच्या सहकार्यामुळे आणि उत्तम नियोजनामुळे हा सीन पूर्ण करू शकलो”. मधुरा (madhura deshpande ) आणि यशोमान या दोघांनीही या प्रकारचा स्टंट हा पहिल्यांदा केला आहे, यामुळे त्यांचे मराठी सृष्टीतील कलाकारांकडून खास कौतुक देखील होत आहे.

भूमी (bhoomi ) आणि आकाश(aakash ) चा या प्रसंगाचा कालावधी फार लहान आहे. पण या प्रसंगाला शूट करण्यासाठी बराच अवधी लागला असे सांगण्यात येते. हा संपूर्ण प्रसंग दिग्दर्शक आणि फाईट मास्टरच्या मार्गदर्शनाखाली शूट करण्यात आला आहे.

 

हे ही वाचा:

IND vs NZ 3rd ODI रोहित आणि गिलचे अर्धशतक पूर्ण, भारताची १५० धावांच्या दिशेने वाटचाल सुरू

Athiya Shetty – KL Rahul यांचा लग्न सोहळा थाटात झाला संपन्न, पहा खास फोटो

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss