spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Maghi Ganesh Jayanti 2023 माघी गणेश जयंतीला बाप्पाला दाखवा पौष्टिक आणि स्वादिष्ट अशा तिळाच्या मोदकांचा नैवैद्य

मोदक (Modak) हा बाप्पाचा आवडता पदार्थ आहे. त्यामुळे तिलकुंद चतुर्थीच्या दिवशी बाप्पाच्या नैवेद्यामध्ये तिळापासून बनवलेले पदार्थ खाल्ले जातात.

माघी गणेश जयंती म्हणजे गणपती बाप्पाचा जन्मसोहळा. हिंदू कॅलेंडरनुसार माघ महिन्याच्या चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. हा दिवस तिलकुंद चतुर्थी म्हणून देखील ओळखला जातो. माघ महिन्यात ऋतूचक्रानुसार हिवाळ्यात हि जयंती साजरी केली जाते. त्यामुळे माघ महिन्यातील गणेश चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी साजरी केली जाते. बाप्पाच्या नैवद्यामध्ये तिळाच्या पदार्थाचा हमखास वापर केला जातो. मोदक (Modak) हा बाप्पाचा आवडता पदार्थ आहे. त्यामुळे तिलकुंद चतुर्थीच्या दिवशी बाप्पाच्या नैवेद्यामध्ये तिळापासून बनवलेले पदार्थ खाल्ले जातात. मग यंदा बाप्पाच्या नैवेद्यासाठी तीळापासून बनवलेले मोदक हा खास पदार्थ नक्की करायला हवा.

तिळाचे मोदक बनवण्याचे साहित्य –

  • १ कप तीळ
  • १/२ कप शेंगदाणे
  • १ वाटी साधा गुळ
  • २ चमचे साजूक तूप

तिळाचे मोदक बनवण्याची कृती –

  1. सर्वप्रथम १ वाटी तीळ भाजून घ्यावे त्यानंतर त्याच पँन मध्ये शेंगदाणे भाजून घ्यावे. सर्वात आधी आपण मिक्सरमध्ये तीळ जाड बारीक करून घेणार आहोत.
  2. बारीक केलेले तीळ भांडयामध्ये काढून घायचे आहेत. त्यानंतर त्याच भांद्यात शेंगदाण्याचा बारीक कूट करुन घ्यावा.
  3. आता आपण तिळाचा कूट आणि शेंगदाण्याचा कूट एकजीव (Mixed) करून घायचा आहे. त्यानंतर पॅन मध्ये २ चमचे साजूक तूप आणि त्यामध्ये गुळ घालावा आणि गॅस बारीक आचेवर ठेवावा.
  4. पूर्ण गुळ वितळून द्यावा त्यामध्ये चमच्या मिक्स करत राहावे त्यानंतर त्यामध्ये २ चमचे पाणी टाकावे पाणी घातल्याने मोदक मऊ होतात.
  5. गुळाला फेस येईल पर्यत मिक्स करायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये तिळाचे आणि शेंगदाण्याचे मिश्रण टाकायचे आहे आणि ते एकजीव करून घ्यायचे आहे.
  6. त्यानंतर ते मिश्रण प्लेट मध्ये काढून घायचे आहे त्याआधी प्लेटला तूप लावून घायचे आहेत. त्या नंतर ते मिश्रण मोदकाच्या साचामध्ये गरम गरम भरायचे आहे.
  7. कारण मिश्रण थंड झाल्याने आकार येत नाही. हाताला पाणी लावून मिश्रणाला साचामध्ये भरून घ्यायचे आहे. मोदकाचा आकार आल्यावर ते एक प्लेट मध्ये काढून घ्यावे झाले आपले पौष्टिक आणि स्वादिष्ट मोदक तयार आहेत.

हे ही वाचा:

३-० ने भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय, क्रमवारीतही पटकावले अव्वल स्थान

गोपीचंद पाडळकरांचा अजित पवारांवर हल्लाबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss