spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राजनाथ सिंह यांचा पक्ष देशात द्वेष पसरवत असून.. , राहुल गांधी यांचा भाजपवर गंभीर आरोप

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा आता सध्या जम्मू कशमीर येथे आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात सुरु असलेलय काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला देशभरातील जनतेकडून मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. ही यात्रा जम्मू कशमीरमध्ये असताना मंगळवारी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.यावर राहुल गांधी यांनी भाजप आणि भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग (Rajnath Singh) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच राहुल गांधी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी सर्जिकल स्ट्राईकसंदर्भातून केलेल्या वक्तव्याचा सुद्धा विरोध केला आहे.

अलीकडेच मध्य प्रदेश सरकारने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग (Rajnath Singh) यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेसंदर्भातुन भाष्य केले होते तसेच त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह (Digvijaya Singh) यांनी सर्जिकल स्ट्राईक वर प्रश्नश्चिन्ह उपस्थित केले होते, त्यावरही भाष्य केले होते आणि राहुल गांधी यांच्यावरही आरोप केले होते. राजनाथ सिंग यांनी ” राहुल गांधी यांना भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून द्वेष निर्माण करून सत्ता मिळवायची आहे.का ?”. असा सवाल राजनाथ सिंग यांनी राहुल गांधी यांना केला होता. तर मंगळवारी जम्मू कशमीर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी राजनाथ सिंग यांच्या प्रश्नाचे उत्तर देताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितल की “देशभरात सुरू असलेली आणि देशाला जोडणारी पदयात्रा देशाच्या हिताला कशी हानी पोहोचवत आहे, हे मला समजत नाही. राजनाथ सिंह यांचा पक्ष देशात द्वेष पसरवत असून त्यामुळे देशाचं नुकसान होत आहे.” असे म्हणत राहुल गांधी यांनी भाजाप वर गंभीर आरोप केला आहे.

राहुल पुढे म्हणाले की “भाजप धर्म, जात आणि लिंगाच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडतंय. देशात द्वेष पसरवत आहे. भारताच्या बंधुत्वाबद्दल, भारताच्या संस्कृतीबद्दल देशात काय चाललंय?” असा सवालही राहुल गांधी यांनी या पत्रकार परिषदेत विचारला आहे. तसेच “राजनाथ सिंह एका पक्षाचा भाग आहेत,ते स्वतःचा दृष्टिकोन मांडत नसून . ते त्यांच्या पक्षाची भाषा बोलत आहेत. ” असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

Maghi Ganesh Jayanti 2023 माघी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने जाणून घ्या बाप्पाच्या जन्माची कथा

Maghi Ganesh Jayanti 2023, माघी गणेश जयंतीसाठी उकडीचे मोदक बनवण्याची सोपी पद्धत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss