spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

महाराष्ट्रातील सीमावादात होणार तेलंगणाचा सहभाग?, मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव घेणार महाराष्ट्रात सभा

शिंदे फडणवीस सरकारच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण हे चांगलाच तापलेल आहे. त्यानंतर महाराष्ट्र आणि बेळगावचा सीमाप्रश्नावर राजकीय वातावरण आणखी तापलं होत. सध्या महाराष्ट्रातील राजकारणात खूप चलबिचल सुरु आहे. त्यात आता तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao) हे पहिल्यांदाच महाराष्ट्रात सभा घेणार आहेत. ही सभा नांदेडमध्ये आयोजित करण्यात आली आहे. अगोदर ही सभा १५ जानेवारी रोजी होणार होती पण शिक्षक मतदारसंघाच्या आचारसंहितेमुळे सभा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर आता ५ फेब्रुलारीला ही सभा होणार आहे. तसेच नांदेडमधील (Nanded) नवीन मोंढा मैदानात सभा पार पडणार आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao) यांचा पक्ष आता राष्ट्रीय राजकारणात येणार असल्याची चर्चा सुरु आहे. पक्ष वाढीसाठी आणि पक्ष बांधणीसाठी के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao) यांनी महाराष्ट्रात पहिल्या महासभेचं आयोजन केले आहे.

आजपर्यंत अनेक प्रादेशिक पक्षांनी महाराष्ट्रातील राजकारणात प्रवेश केला आहे. आणि असे म्हटले म्हणायला हरकत नाही की नांदेड हे ठिकाण महाराष्ट्रातील राजकारणात प्रवेश करण्याचे माध्यम बनले आहे. याचे कारण म्हणजे ओवैसींच्या (Owaisi) एमआयएमनंही (MIM) नांदेडमधूनच महाराष्ट्रातील राजकारणात प्रवेश केला होता. त्यानंतर एमआयएम (MIM) कडून त्याने आमदार आणि खासदाराही निवडून आले आहेत. आता तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao) त्याच मार्गाचा अवलंब करून महाराष्ट्रात येत असल्याचे सांगितले जात आहे. के. चंद्रशेखर राव (K.Chandrashekar Rao) यांच्या या सभेला सीमावादाचीही पार्श्वभूमी आहे. कारण ज्या पद्धतीनं काही गावांनी कर्नाटकात जाण्यासाठी ठराव मंजूर केले. त्याच पद्धतीनं नांदेडच्या तेलंगाणा सीमा भागातल्या काही गावांनीही ठराव करत त्यांनी तेलंगाणात जाण्याची तयारी दर्शवली होती. के. चंद्रशेखर राव यांच्या पक्षाचे नाव आधी तेलंगाणा राष्ट्र समिती होता. ते नंतर त्यांनी बदलून बीआरएस म्हणजेच भारत राष्ट्र समिती (Bharat Rashtra Samithi) केले आणि राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री घेतली आहे.

नांदेड (Nanded) मध्ये आयोजित करण्यात आलेल्या के. चंद्रशेखर राव (K.Chandrashekar Rao) यांच्या सभेत तेलुगू भाषिकांसह वंचित समाजांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तेलंगाणात हाच मतदार वर्ग काँग्रेससोबत होता आणि आता तोच मतदार वर्ग हा बीआरएससोबत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणावर के. चंद्रशेखर राव यांच्या नांदेडमधील सभेचा काय परिणाम होतील हे पाहून गरजेच आहे .

हे ही वाचा:

Maghi Ganesh Jayanti 2023 माघी गणेश जयंतीला बाप्पाला दाखवा पौष्टिक आणि स्वादिष्ट अशा तिळाच्या मोदकांचा नैवैद्य

Maghi Ganesh Jayanti 2023 माघी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने जाणून घ्या बाप्पाच्या जन्माची कथा

Maghi Ganesh Jayanti 2023 माघी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने जाणून घ्या बाप्पाच्या जन्माची कथा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss