spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पिंपरी चिंचवड आणि कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी उतरणार की नाही? संजय राऊत म्हणले,…

राज्यात पिंपरी चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर आता सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

राज्यात पिंपरी चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर आता सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. या मतदारसंघात उमेदवार देण्याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात पिंपरी चिंचवडची जागा शिवसेनेने लढवावी आणि कसबा मतदारसंघ काँग्रेस-राष्ट्रवादीने लढवावा, अशी आमची भूमिका असल्याचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

काल दि २४ जानेवारी रोजी पिंपरी चिंचवड आणि कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या संदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झालेली आहे. तसेच आज पुन्हा एकदा त्यावर चर्चा केली जाणार आहे. पिंपरी चिंचवडची जागा शिवसेनेनी द्यावी, तसेच पुण्यातील कसबा मतदारसंघाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादी निर्णय घ्यावा, अशी भूमिका संजय राऊत यांनी माध्यमांसमोर व्यक्त केली. आम्ही निवडणुकीपासून लांब राहिलो तरी काही अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे मविआने या पोटनिवडणुका लढविण्याचा विचार केला असल्याचेही संजय राऊत म्हणाले.

आज सकाळी माध्यमांशी बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले, “अंधेरीची निवडणूक बिनविरोध झालेली नव्हती. भाजपाकडे उमेदवार नव्हता, म्हणून त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपला चिंता काढला. तसेच ते पुढे म्हणाले, नांदेड आणि पंढरपूर येथे देखील पोटनिवडणुका बिनविरोध झाल्या नाहीत. दोन्ही ठिकाणी मृत आमदाराचे नातेवाईक उभे असतानाही भाजपाकडून उमेदवार देण्यात आले. पंढरपूर-नांदेडच्या निवडणुकीत संस्कृती दिसली नाही. अंधेरीच्या निवडणुकीत दिसली त्याला वेगळी कारणे आहेत.” काल महाविकास आघाडीची बैठक ही पार पडली. त्यावेळेस संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका व्यक्त केली असली तरीही अजून महाविकास आघाडीची अधिकृत भूमिका ही समोर आलेली नाही. पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादी या पक्षाचे प्राबल्य आहे. तसेच रःटरवाडी काँग्रेस या दोन्ही जागा या दोन्ही जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस इच्छूक आहे. महानगरपालिकेवर सातत्याने राष्ट्रवादीची सत्ता राहिली होती. लक्ष्मण जगताप देखील अनेक वर्ष राष्ट्रवादी सोबत होते. तर दुसरीकडे पुण्यात देखील राष्ट्रवादीचे संघटन मजबूत आहे. राष्ट्रवादीचे पुणे मनपामध्ये चांगले प्रतिनिधित्व आहे. तसेच काँग्रेसची देखील पुण्यात चांगली ताकद आहे. त्यामुळे या दोन जागा कोणत्या पक्षांना मिळणार याचा निर्णय अद्याप होणे बाकी आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्रातील सीमावादात होणार तेलंगणाचा सहभाग?, मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव घेणार महाराष्ट्रात सभा

राशी भविष्य,२५ जानेवारी २०२३, शेअर बाजार , लॉटरी यासारख्या क्षेत्रातून उत्पन्न वाढेल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss