spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

National Tourism Day 2023, तुम्हालाही पर्यटन करायला आवडते, तर जाणून घ्या कशी झाली सुरवात पर्यटनाची…

देशविदेशात असे असंख्य लोक आहेत त्यांना फिरायला खूप आवडते. पर्यटन (Tourism) करणे हा कित्येकांचा छंद असतो.या पर्यटनाचे बरेच प्रकार आहेत. काही हरहुन्नरी पर्यटक (tourists) आपल्याला बघायला मिळतात जे कि पायवाटेने किंवा सायकलने प्रवास करून आपली पर्यटनाची स्वप्न पूर्ण करतात.

देशविदेशात असे असंख्य लोक आहेत त्यांना फिरायला खूप आवडते. पर्यटन (Tourism) करणे हा कित्येकांचा छंद असतो.या पर्यटनाचे बरेच प्रकार आहेत. काही हरहुन्नरी पर्यटक (tourists) आपल्याला बघायला मिळतात जे कि पायवाटेने किंवा सायकलने प्रवास करून आपली पर्यटनाची स्वप्न पूर्ण करतात. अश्या पर्यटन प्रेमींना माहित असेल कि आज राष्ट्रीय पर्यटन दिवस आहे. दर २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय पर्यटन दिवस (National Tourism Day) साजरा केला जातो. पण आज हा दिवस का साजरा केला जातो हे आपल्याला माहित नसते. पर्यटनाचा आपल्या देशाला प्रचीन इतिहास आहे. भारताचा शोधही असाच लागला असे म्हंटले जाते.

जगभरातील देशांमध्ये २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा केला जातो. पण भारतात मात्र राष्ट्रीय पर्यटन दिवस २५ जानेवारीला साजरा केला जातो. फिरणे , ठीक ठिकाणी जाऊन तेथील वातावरणाचा अनुभव घेणे हाच केवळ पर्यटनाचा भाग नसून पर्यटन हे उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्वाचे आहे. हे भारत सरकारने आधीच लक्षात घेतले होते, त्यामुळे राष्ट्रीय पर्यटन दिवस स्वातंत्र्यानंतर लगेचच १९४८ मध्ये सुरू झाला. त्याचे पहिले मुख्यालय दिल्लीत (Delhi) ठेवण्यात आले होते, परंतु मुंबईतील वाढते पर्यटन बघून नंतर ते मुंबईला हलविण्यात आले. तीन वर्षांनी म्हणजे १९५१ मध्ये या समितीची आणखी कार्यालये निर्माण करण्यात आली ती चेन्नई (Chennai) (मद्रास) आणि कोलकाता (Kolkata) येथे सुरू झाली. अश्या प्रकारे १९९८ मध्ये, पर्यटन आणि दळणवळण मंत्रालयाच्या अंतर्गत पर्यटन विभागाची स्थापना करण्यात आली.

काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, भारताकडे एक बहुभाषिक, बहु-धर्मीय देश म्हणून पाहिले जाते, जिथे दर ५ किमी अंतरावर धर्म, बोली, भाषा आणि पेहराव बदलतो. अशीच काहीशी परिस्थिती भारतातील पर्यटन स्थळांची आहे.अश्या विविध प्रातांनी, भाषेने, विविधतेने भारत सजलेला आहे ज्याला पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक गर्दी करतात.राष्ट्रीय पर्यटन दिवस भारतातील या पर्यटन स्थळांना प्रोत्साहन देतो आणि त्यांना जागतिक स्तरावर त्याची प्रसिद्धी होते . पर्यटन हे नुसते भारतीय स्थळांना (Indian sites) प्रोत्साहन देत नाहीत तर यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होतो. अर्थव्यवस्थेला हातभार म्हणूनच सुरवातीला पर्यटन व्यवसायाची सुरवात करण्यात अली होती.

हा दिवस विविध प्रकारे भारतात साजरा केला जातो, या दिवसाच्या माध्यमातून लोकांना जागतिक स्तरावर पर्यटनाचे सामाजिक(social), राजकीय(political), आर्थिक (financial)आणि सांस्कृतिक मूल्य किती आहे, याची जाणीव करून द्यावी लागेल. यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच पर्यटन कार्यशाळा यांचे आयोजन केले जाते. याशिवाय पर्यटनाच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्था मजबूत केली जाते.

हे ही वाचा:

पिंपरी चिंचवड आणि कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी उतरणार की नाही? संजय राऊत म्हणले,…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss