spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Republic Day 2023, ‘या’ ठिकाणी पार पडले होते ‘प्रजासत्ताक दिना’चे पहिले संचलन

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीतील संचलन सोहळ्याचे आयोजन दरवर्षी चर्चेत असते. यंदा देशभरात २६ जानेवारी हा दिवस मोठा जल्लोषात साजरा केला जाणार आहे. भारतातील संस्कृती, लोकशाहीची ताकत, भारतीय सैन्यदल, हवाईदल, वायूदल याच्या कवायती, विविध राज्यांमधून वेगवेगळे चित्ररथ संचालनामध्ये सहभागी होतात.

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीतील संचलन सोहळ्याचे आयोजन दरवर्षी चर्चेत असते. यंदा देशभरात २६ जानेवारी हा दिवस मोठा जल्लोषात साजरा केला जाणार आहे. भारतातील संस्कृती, लोकशाहीची ताकत, भारतीय सैन्यदल, हवाईदल, वायूदल याच्या कवायती, विविध राज्यांमधून वेगवेगळे चित्ररथ संचालनामध्ये सहभागी होतात. या सोहळ्यात राजपथावर हा आकर्षक चित्ररथ पाहून डोळे दिपून जातात. प्रजासत्ताकच्या दिवशी संपूर्ण भारत आणि देशाबाहेरील भारतवासी आतुरतेने या सोहळ्याची वाट पाहत असतात. त्यामुळे राजपथावरील सोहळ्याचे हे संचलन या दिवशी आकर्षुन घेते. घटनासभेने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केलाआणि २६ नोव्हेंबर १९५० पासून राज्यघटना लागू झाली. या सोहळ्याची सुरुवात १९५० पासून सुरु झाली आहे. पण तुम्हा सगळ्यांना माहिती आहे का पहिल्या प्रजासत्ताक दिनाचे संचलन कुठे घेण्यात आले? तर प्रजासत्ताक दिनचे पहिले संचलन हे नॅशनल स्टेडियम मुंबई येथे पार पडला होता.

१९४७ साली भारत इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आणि स्वातंत्र मिळाल्यानंतर म्हणजेच २६ जानेवारी १९५० रोजी भारत देश ‘सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक’ म्हणून ओळखला जाऊ लागला. यावर्षी आपला भारत देश ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. हा सोहळा आधी १९५० ते १९५४ च्या काळात इरविन स्टेडियम, लाल किल्ला, राम लिला मैदान अश्या विविध ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. १९५५ चा संचलन सोहळ्याचे आयोजन राजपथावर करण्यात आले. १९५० मध्ये इरविन स्टेडियम येथे पार पडलेल्या या सोहळ्यात भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून राजेंद्र प्रसाद यांनी शपत घेतली होती. जसे आता प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी आपणा सर्वाना उत्सुकता असते तशीच पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी इर्विन स्टेडियम मध्ये १५ हजार देशवासी उपस्थित होते. त्यावेळी या संचलनात सैन्यदल, वायुदल, नौदलाचा समावेश होता आणि सेनेचे सात बॅंडचा सुद्दा समावेश होता.

प्रजासत्ताक दिनाच्या पहिल्या वर्षांपासून भारत प्रत्येक वर्षी विदेशातील मुख्यपदावरील राज्यकर्ते किंवा उच्च पदावरील अधिकाऱ्यांना प्रमुख पाहुणे (Guest) म्हणून आमंत्रिक करतो. पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकर्णो यांनी उपस्तिथी लावली होती.

हे ही वाचा:

Maghi Ganesh Jayanti 2023 माघी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने जाणून घ्या बाप्पाच्या जन्माची कथा

Maghi Ganesh Jayanti 2023, माघी गणेश जयंतीसाठी उकडीचे मोदक बनवण्याची सोपी पद्धत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss