spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Republic Day 2023, यंदा बनवा तिरंगा स्पेशल केक

Tricolor Special Cake : भारतवासी २६ जानेवारी हा दिवस साजरा करतात कारण त्या दिवशी आपली राज्यघटना आपल्या भारत वासियांना लागू झाली आहे. म्हणूनच हा दिवस सर्वच भारतीय मोठ्या अभिमानाने आणि उत्साहाने साजरा करतात.

Tricolor Special Cake : भारतवासी २६ जानेवारी हा दिवस साजरा करतात कारण त्या दिवशी आपली राज्यघटना आपल्या भारत वासियांना लागू झाली आहे. म्हणूनच हा दिवस सर्वच भारतीय मोठ्या अभिमानाने आणि उत्साहाने साजरा करतात. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपण तिरंगा रंगाचे कपडे तर घालतोच परंतु प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपण जर तिरंगा रंगाचा केक नाही बनवला तर प्रजासत्ताक दिनाचे सेलिब्रेशन हे अपूर्ण राहील. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला तिरंगा केकची रेसिपी कशी बनवतात ते सांगणार आहोत.

केक बनवन्याचे साहित्य –

१.५ कप मैदा
अर्धा चमच बेकिंग सोडा
१ चमच बेकिंग पावडर
अर्धा कप पाडवर साखर
१-२ ड्रॉप व्हेनेला सिरप
अर्धा कप कूकिंग ऑइल
अर्धा कप मिल्क मेड
१ कप सोडा वॉटर
१ बटर पेपर

केक बनवायची कृती –

  • १.५ कप मैदा, अर्चा चमच बेकिंग सोडा, १ चमच बेकिंग पावडर, १ चमच बेकिंग पावडर, हे सर्व पदार्थ एकत्र चाळणीने चाळून घ्यावे.
  • आता एक मोठे भांडे घ्या. त्या भांड्यामध्ये पावडर साखर टाका. त्यामध्ये १ कप तेल टाकावे. त्यानंतर मग ते मिक्स करून घ्यावे.
  • त्यानंतर त्यामध्ये मिल्क मेडचे द्रावण टाकायचे आहे आणि ते मिक्स करून घायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये सोडा वॉटर टाकायचे आहे.
  • सोडावॉटर टाकल्यानंतर ते चांगले मिक्स करून घायचे आहे. त्यानंतर चाळून ठवलेलं सर्व पदार्थ थोडेथोडे करून ते त्या मिश्रणामध्ये टाकायचे आहेत. जर सर्व मिश्रण एकत्र टाकले तर त्यातील गोळे तसेच राहतात. त्यामुळे ते थोडे थोडे करून एकत्र करत राहायचे आणि चमच्याने मिक्स करत राहायचे.
  • त्यानंतर त्या मध्ये १-२ ड्रॉप व्हॅनिला सिरप टाकायचे आहे. त्यानंतर ते द्रावण मिक्स करत राहायचे. जो पर्यत ते द्रावण पातळ होत नाही तोपर्यत द्रावण मऊ झाल्यावर ते द्रावण केक बाउल मध्ये टाकावे. द्रावण टाकण्याआधी त्या केक बाउल मध्ये बटर पेपर टाकावा. द्रावण टाकल्यावर ते शिजण्यासाठी ४० ते ४५ मिनिटे ठेवावी.
  • नंतर ४०-४५ मिनिटानंतर केक बाहेर काढून त्याचे ३ समान भाग करावे. केकचे ३ भाग झाल्यावर त्यावर शुगर सिरप लावून घावे. त्यानंतर तिरंगमध्ये हिरवा रंग असतो म्हणून केक च्या सर्वात खालच्या भागाला किवी क्रश (juice) लावायचे आहे. किवी क्रश दिसायला सुद्धा हिरवा रंग आणि खाण्यासाठी सुद्धा चवदार असते. त्या नंतर त्या किवी क्रश वर हिरव्या रंगाची क्रीम लावायची आहे.

  • दुसऱ्या भागामध्ये पाईन अँपल क्रश टाकायचे आहे. ते पसरून घायचे आहे. त्या नंतर त्यावर सफेद रंगाची क्रीम पसरवायची आहे.
  • त्या नंतर सर्वात शेवटचा भाग आहे त्या वर ऑरेज क्रश टाकायचे आहे आणि ते पसरवायचे आहे. त्या नंतर त्या नारिंगी रंगाचे क्रीम टाकायची आहे. आणि ती पसरून घायची आहे. त्यानंतर केकच्या बाजूच्या कडाना आकार द्यायचाया आहे.
  • मग तुमचा तिरंगा चा केक तयार होईल नक्की तरी करून पहा

हे ही वाचा:

ICC ODI Rankingमध्ये मोहम्मद सिराजचा ‘राज’ सर्व खेळाडूंनी मागे ठरला नंबर १ गोलंदाज

#HarSawalUthega म्हणत प्रजासत्ताक दिनानिमित्त टाटा कंपनीने लहान मुलांसाठी नवी मोहीम घेतली हाती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss