spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Republic Day 2023, राष्ट्रपतींबरोबर असणाऱ्या बॉडीगार्ड्सची कशी केली जाते निवड?

राष्ट्रपती भवनावर एखादा खास कार्यक्रम असो किंवा स्वातंत्र्य दिनाची परेट राष्टपतींसोबत असलेल्या त्यांच्या बॉडीगार्डकडेही जनतेची पारखी नजर असते. याचे खास कारण म्हणजे त्यांचा लाल रंगाचा विशिष्ठ पोशाख तसेच तंदुरुस्त शरीर, लांब उंची, अमी अरुंद छाती यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व सर्वांमध्ये उठून दिसते.

राष्ट्रपती भवनावर एखादा खास कार्यक्रम असो किंवा स्वातंत्र्य दिनाची परेट राष्टपतींसोबत असलेल्या त्यांच्या बॉडीगार्डकडेही जनतेची पारखी नजर असते. याचे खास कारण म्हणजे त्यांचा लाल रंगाचा विशिष्ठ पोशाख तसेच तंदुरुस्त शरीर, लांब उंची, अमी अरुंद छाती यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व सर्वांमध्ये उठून दिसते. पण तुम्हाला माहित आहे का यांची निवड कशी केली जाते? या सुरक्षा देणाऱ्या जवानांची निवड प्राचीन काळापासून खास पद्धतीने केली जाते. तर आपण जाणून घेऊयात कशी होते यांची निवड.

राष्ट्रपतीच्या बॉडीगार्डला PBG असे म्हटले जाते

हे लोक फार महत्वाची कामगिरी भारताच्या राष्ट्रपतींसाठी करतात. कारण या दिवशी राष्ट्रपतींची सुरक्षिततेची जबाबदारी त्यांच्यावर असते. या बॉडीगार्ड्सची निवड भारतीय सेनेतील घोडेस्वारी फौज रेजिमेंट (Army regiment) मधून केली जाते. हे सर्वाधिक जुने घोडेस्वार युनिट आणि फौज रेजिमेंट मधील सिनियर युनिट मधील असतात. हे युनिट राष्ट्पतींच्या सर्व अधिकृत कार्यक्रमांच्या वेळी त्यांच्या सोबत असतात. त्यांची निवड त्यांना दिलेल्या टास्कमध्ये ते कशा पद्धतीने पूर्ण करतात त्यानुसारच केली जाते. घोडेस्वारीमध्ये त्यांना मात देणे कठीण असते. तसेच ते एक सक्षम टँक मॅन आणि पॅराट्रूपर्स म्हंटले जाते.

राष्ट्रपतींसाठी बॉडीगार्ड असण्याची ही परंपरा फार जुनी आहे. याची सुरवात १७७३ मध्ये इंग्रज गव्हर्नर (Governor) जनरल वॉरेन हेस्टिंगन (General Warren Hastingen) यांनी केली. त्यांनी आपल्या सुरक्षेसाठी ५० घोडेस्वार सैनिकांची मिळून एक तुकडी तयार केली होती. त्यांना मुगल हॉर्स (Mughal Horse) असे म्हटले जायचे. मुगल हॉर्सची स्थापना १७६० मध्ये सरदार मिर्जा शाहबाज खान आणि सरदार खान तार बेन यांनी केली होती. त्याकाळी बनारसचा राजा चैत सिंह यांनी या युनिटसाठी ५० घोडेस्वार दिले होते. तसेच या युनिट मध्ये १०० घोडेस्वार होते. ही परंपरा पूर्वापार चालत अली असून, राष्ट्रपतींच्या या युनिटमध्ये फक्त राजपूत, जट आणि शिखांचीच निवड होते. सुरुवातीला १७७३ मध्ये जेव्हा या युनिटचे एकत्रीकरण करण्यात आले होते. त्यावेळी मुस्लिमांना सुद्धा भरती करण्यात आले होते. नंतर मुस्लिमांसह हिंदू, ब्राम्हण यांना सुद्धा भरती केले जाऊ लागले.

पण १८९५ नंतर यामध्ये ब्राम्हणांची भरती करणे बंद केले कारण, या युनिटमध्ये सहभागी होणाऱ्या जवानांची उंची कमीत कमी ६.३ फूट असणे गरजेचे होते.त्यांचे डेप्युटी होते साहबजादा याकूब खान. पीबीजीच्या (PBG) जवानांची खासियत म्हणजे त्यांचे मजबूत घोडे.यामध्ये जर्मनीतील खास ब्रीडच्या घोड्यांचा समावेश असतो.उंच मान असलेल्या या घोड्यांचे वजन जवळजवळ ४५० ते ५०० किलो असते. भारतीय सेनेत फक्त त्याच घोड्यांचे केस लांब ठठेवता येतात.

हे ही वाचा:

Republic Day 2023, ‘या’ ठिकाणी पार पडले होते ‘प्रजासत्ताक दिना’चे पहिले संचलन

Republic Day 2023, यंदा बनवा तिरंगा स्पेशल केक

Republic Day 2023, गाडीला तिरंगा लावत आहात? परंतु कोणत्या बाजूने लावतात तुम्हाला माहित आहेत का ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss