spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

लवकरच राजकीय आरोग्याच्या काळजीसाठी ठाण्यात येणार, उद्धव ठाकरेंची घोषणा

काही महिन्यापूर्वी शिवसेनेत मोठा बंड हा झाला होता. शिवसेनेतील मोठा नेता म्हणजेच एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारला आणि शिवसेनेतून काढता पाय घेतला. तेव्हा झालेले बंडाचे पडसाद अजूनही राज्यात दिसून येत आहेत.एकनाथ शिंदे यांनी केलेल्या या बंडांनंतर शिवसेनेत उभी फूट पडली आणि शिवसेनेचे ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन भाग झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे प्रथमच ठाण्यात दाखल झाले आहे. उद्धव ठाकरे यांचं ठाकरे गटाकडून जोरदार स्वागत करण्यात आलं आहे. मुंलुंड ठाणे टोलनाक्यावर अनेक ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. तर या वेळी त्याची जांभळी नाका येथे उद्धव ठाकरे गटाकडून महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या महाआरोग्य शिबिराचं उदघाटन करण्यात आलं. तर या वेळी उद्धव ठाकरे यांनी ठाणेकरांशी संवाद साधला. लवकरच ठाण्यामध्ये सभा घेण्यात येणार आहे अशी घोषणा या वेळी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, “मी इथे भाषण करायला उभा नाही, मात्र लवकरच भाषण करायला येणार आहे. आज नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आलो आहे. येत्या काही दिवसात ठाणेकरांच्या राजकीय आरोग्यासाठी मी इथे येणार आहे. सध्या राजकारणात विकृतपणा आणि गलिच्छपणा आलेला आहे. तो समोर दिसत असतानाही शिवसेना आपल्या मूळ हेतूपासून दूर गेलेली नाही याचा अभिमान आहे. अन्यायाला लाथ मारायची आहेच, पण ८० टक्के समाजसेवा आणि २० टक्के राजकारण ही शिवसेनाप्रमुखांची शिकवण आपण विसरलेलो नाही. राजन विचारे त्यांचे शिलेदार निष्ठावंत शिवसैनिक (Loyal Shiv Sainik) इथे आहेत. बाकी विकाऊ होते ते विकले गेले, त्यांचा भाव सांगण्याची गरज नाही.”

उद्धव ठाकरे यांनी आजच आपण ठाण्यात लवकर सभा घेणार असून सगळ्या गोष्टींना उत्तरं देणार असल्याचं म्हटलं आहे. ठाण्यात उद्धव ठाकरे सभा कधी घेणार आणि नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण उद्धव ठाकरे हे सभा घेताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा समाचार घेणार हे नक्की आहे. शिवसेनेत जे काही घडलं त्यामुळे देशभरात महाराष्ट्राची बदनामी झाली असंही उद्धव ठाकरेंनी भाषणात सांगितलं. तसंच ५० खोके एकदम ओके ही घोषणा राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतही (India Jodo Yatra) पोहचली आहे त्याबद्दल आपल्याला संजय राऊत यांनी सांगितलं असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

Latest Posts

Don't Miss