spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

उद्धव ठाकरे आनंद आश्रमात जाणार का ? राजकीय वातावरण तापलं

उद्धव ठाकरे ठाणे दौऱ्यावर आल्यानंतर ठाकरे गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. दरम्यान, काही दिवसांआधी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ज्या जैन मंदिराला भेट दिली होती, त्याच जैन मंदिराची उद्धव ठाकरेंनी भेट घेतली आहे. तर पुढे उद्धव ठकरे हे आनंद आश्रममध्ये जाणार आहेत. पण मिळालेल्या माहितीनुसार सध्या ठाणे पोलिसांकडून उद्धव ठाकरे यांना आनंद आश्रमामध्ये न जाण्यासाठी विनंती करण्यात येत आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, ज्याने कायदा आणि सुवेवस्था बिघडेल अशी खबरदारी ठाणे पोलिसांकडून घेण्यात येत आहे. तर आता उद्धव ठाकरे हे आनंद आश्रमात जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

या कृत्यावरून शिंदे गट शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या टेंभीनाका येथील आनंद आश्रम (Anand Ashram) ही मूळ शिवसेनेची शाखा ‘हायजॅक’ करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप ठाकरे समर्थकांकडून होऊ लागला आहे. तसेच उद्धव ठाकरे ठाण्याच्या दौऱ्यावर असतानाच अचनाकपणे हा फलक लावल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

टेंभीनाका येथील आनंद आश्रमात शिवसेनेने दिवंगत नेते आनंद दिघे वास्तव्यास होते. या आश्रमात आनंद दिघे शिवसेनेचा कारभार चालवत होते. तेथेच जनतेशी संवाद साधून त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत होते. दिघे यांच्या निधनानंतर त्या आश्रमात शिवसैनिक उपस्थित राहत होते. आता शिवसेनेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडले आहेत. मात्र या आनंद आश्रमात दोन्ही गटाचे कार्यकर्ते उपस्थित राहत होते. त्यावरून त्यांच्यात चढाओढ सुरू होती.

Latest Posts

Don't Miss