spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Shyamchi Aai चित्रपटाचं नवं पोस्टर प्रदर्शित

साने गुरुजी (Sane Guruji) या नावाने सर्वांच्या परिचयाचे असणारी 'श्यामची आई' (Shyamchi Aai) या कादंबरीवर आधारित एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Shyamchi Aai : साने गुरुजी (Sane Guruji) या नावाने सर्वांच्या परिचयाचे असणारी ‘श्यामची आई’ (Shyamchi Aai) या कादंबरीवर आधारित एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘श्यामची आई’ असं आहे. पांडुरंग सदाशिव साने यांनी ‘श्यामची आई’ (Shyamchi Aai) ही कादंबरी लिहिली आहे. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जिथे कृष्णधवल चित्रपटांना रंगीन बनवण्याची अद्भूत किमया केली जाते. तिथे ‘श्यामची आई’ हा चित्रपट कृष्णधवल रूपात पहायला मिळणार आहे. साने गुरुजींच्या अंर्तमनातून आलेली आईच्या आकृतीचे प्रतिबिंब रुपेरी पडद्यावर सादर करण्याचं शिवधनुष्य ‘श्यामची आई’ या चित्रपटाच्या माध्यमातून उचलण्यात आलं आहे.

‘श्यामची आई’ या चित्रपटाचं नवं पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे. साने गुरुजी यांनी ‘श्यामची आई’ ही कादंबरी १९३३ मध्ये लिहिली आहे. त्या कादंबरीमध्ये त्यांनी आईबद्दलचे प्रेम, भक्ती आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे. या पुस्तकाचं वर्णन ‘मातृप्रेमाचं महामंगल स्तोत्र’ असे आचार्य अत्रे यांनी केलं आहे. या पुस्तकांवरच आधारित आणि वारसा जपत ‘श्यामची आई’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sujay Sunil Dahake (@tour_de_dahake)

‘श्यामची आई’ चित्रपटाची निर्मिती अमृता फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मात्या अमृता अरुण राव यांनी केली आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन सुजय डहाके यांनी केलं आहे. तर या चित्रपटात साने गुरुजींची भूमिका ओम भूतकरनं यांनी साकारली आहे. एका लक्षवेधी पोस्टरच्या माध्यमातून ओमचा लूक रिव्हील करण्यात आला आहे. परंतु आता आईची भुमिका कोण साकारणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. परंतु आज दि २६ जानेवारी रोजी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर ‘श्यामची आई’ या चित्रपटाचं नवं कोरं कृष्णधवल पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. यात श्यामच्या भूमिकेत शर्व गाडगीळ दिसतो, तर श्यामच्या आईच्या रुपात गौरी देशपांडे दिसत आहे. या चित्रपटात मयूर मोरे, संदीप पाठक, सारंग साठ्ये, उर्मिला जगताप, दिशा काटकर, गंधार जोशी, अनिकेत सागवेकर, ज्योती चांदेकर आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.

हे ही वाचा:

टी-२० मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का, दुखापतीमुळे रुतुराज गायकवाड मालिकेतून बाहेर

India 74th Republic Day, राजपथावरील आजचा परेड अगदी वेगळा, पहा या परेड संदर्भात खास माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss