spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

के एल राहुलनंतर आता अक्षर पटेलही अडकणार लग्नबंधनात, मेहंदी समारंभाचा व्हिडिओ होतोय व्हायरल

अक्षर पटेल आणि मेहा आज म्हणजेच २६ जानेवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत.

केएल राहुल-अथिया शेट्टीनंतर आता भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल विवाहबंधनात अडकणार आहे. बुधवारी मेहंदी सोहळा पार पडला. यादरम्यान दोघांनी खूप धमाल केली. सध्या अक्षर आणि मेहा पटेलचा डान्स परफॉर्मन्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात दोघांची जोडी खूप क्यूट दिसत आहे. हा व्हिडिओ एका चाहत्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो पाहताच व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये अक्षर ‘तू बन मेरी जान, मैं तुझे जाने ना दूंगा’ या गाण्यावर स्टेजवर डान्स करताना दिसत आहे. अक्षर पटेल आणि मेहा आज म्हणजेच २६ जानेवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. अक्षर पटेलने केवळ लग्नामुळेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. अक्षर आणि मेहा १० वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. बराच काळ डेट केल्यानंतर दोघांनी गेल्या वर्षी जानेवारीमध्ये साखरपुडा केला होता. त्यानंतर दोघेही अनेकदा एकत्र सुट्टी साजरी करताना दिसले होते.

अक्षर पटेल लग्नामुळे भारत-न्यूझीलंड मालिकेतून बाहेर आहे. तो फक्त भारत-श्रीलंका घरच्या मालिकेत खेळताना दिसला. लग्नामुळे न्यूझीलंड संघाविरुद्धच्या मालिकेतून विश्रांती घेण्यासाठी त्याने बीसीसीआयकडे आधीच परवानगी मागितली होती.अक्षर आता फेब्रुवारीमध्ये पुन्हा एकदा मैदानावर दिसणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ८ फेब्रुवारीपासून गावस्कर बॉर्डर मालिका सुरू होत आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्याच्या दृष्टीने भारताला ही मालिका कोणत्याही किंमतीवर जिंकावीच लागेल. अक्षर हा या स्पर्धेत टीम इंडियाचा महत्त्वाचा भाग आहे.

हे ही वाचा:

एलॉन मस्क यांच ट्विटरवरील नाव बदलले, आता मस्क ‘या’ नावाने वापरतात ट्विटर

अमृता फडणवीसांची चाहत्यांना भेट, प्रजासत्ताक दिनानिमित्त लाँच केले नवे गाणे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss