spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

दुबई-जयपूर फ्लाईटला उशीर, प्रवाशाला एक ट्विट पडलं महागात

सध्या रेल्वे बस यांच्या पाठोपाठ आता विमान प्रवासा संबंधीच्या अनेक घटना आणि तक्रारी समोर येत आहेत. रोज एक नवीन घटना बघायला मिळत आहे.

सध्या रेल्वे बस यांच्या पाठोपाठ आता विमान प्रवासा संबंधीच्या अनेक घटना आणि तक्रारी समोर येत आहेत. रोज एक नवीन घटना बघायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी एअर इंडियाच्या विमानात एका महिला प्रवाशावर लघुशंका केल्याची घटना गाडली होती. हि घटना ताजी असतानाच आता अजून एका घटनेची भर त्यात पडली आहे. दुबई-जयपूर विमानाच्या अपहरणाबद्दल खोटे ट्विट एका प्रवाशाने केलं आणि त्याच्या या एका ट्विटमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

खराब हवामानामुळे दुबई-जयपूर विमानाचा मार्ग हा बदलण्यात आला आणि हे विमान इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले.विमान सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी लँड झाले होते आणि दुपारी १ वाजून ४० मिनिटांनी पुन्हा उड्डाणासाठी सज्ज झाले होते. दरम्यान, एका प्रवाशाने ट्विट करत म्हटले की, विमानाचे अपहरण झाले आहे. हि सर्व घटना बुधवारी घडली असून पोलिसांनी त्या प्रवाशाला गुरुवारी अटक करत हि सर्व माहिती दिली आहे. पोलीस उपायुक्त (विमानतळ) रवी कुमार सिंह यांनी हि सर्व माहिती दिली आहे. तसेच राजस्थानमधील नागौर येथील रहिवासी मोती सिंह राठौर असे त्या प्रवाशाचे नाव आहे. दरम्यान प्रवासी मोती सिंह राठोड यांनी फ्लाइट हायजॅक असं ट्विट केलं. या ट्विटनंतर एकच खळबळ उडाली होती.

मोती सिंह राठोड या व्यक्तीला त्यांच्या सामानासह विमानातून उतरविण्यात आले आणि आवश्यक तपासणीनंतर विमान रवाना झाले. त्यानंतर पुढील कारवाईसाठी त्यांना स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने सांगितले की, उड्डाणाला उशीर झाल्याने नाराज होऊन त्याने ट्विट केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून राठोडला अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

दादरची आग तर विझली परंतु राजकारण तापलं, कालिदास कोळंबकर म्हणाले…

के एल राहुलनंतर आता अक्षर पटेलही अडकणार लग्नबंधनात, मेहंदी समारंभाचा व्हिडिओ होतोय व्हायरल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss