spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Kaju katli खूप आवडते पण बनवता येत नाही तर, जाणून घ्या सोपी रेसिपी

मिठाई म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते. मिठाईतील सर्वात जास्त खाला जाणारा पदार्थ म्हणजे काजू कतली (Kaju katli). काजू कतली ही उत्तर भारतातील प्रसिद्ध मिठाई आहे. महाराष्ट्रासह अनेक देशात काजू कतली आवडीने खाल्ली जाते.

मिठाई म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते. मिठाईतील सर्वात जास्त खाला जाणारा पदार्थ म्हणजे काजू कतली (Kaju katli). काजू कतली ही उत्तर भारतातील प्रसिद्ध मिठाई आहे. महाराष्ट्रासह अनेक देशात काजू कतली आवडीने खाल्ली जाते. लग्न सोहळा किंवा एखादे चांगले कार्य असले की त्यादिवशी काजूकतली घरी आणली जाते. परंतु आता बाजारात काजूकतलीची किमती खूप वाढली आहे हे सर्वाना माहित आहे. पण जर हीच काजूकातली तुम्हाला घरी बनवता येत असेल तर, तुमचा खर्चही वाचेल आणि घरच्या घरी चविष्ट मिठाईचा तुम्ही अस्वाद घेऊ शकता. तर जाणून घेऊयात कशी बनवायची काजू कतली .

साहित्य

२ कप काजू किंवा काजूची पावडर
२ चमचे तूप
अर्धा कप पाणी
चांदीचा वर्ख
साखर एक कप
२ चमचे

पाककृती

  • सर्वात प्रथम एक भांड्यात काजू घेऊन ते बारीक कुटून घ्या. त्यातले तेल पूर्णपणे जाईल याची काळजी घ्या.
  • काजू (Cashew) बारीक कुटल्या नंतरही त्यातील गर तसेच असतील तर ते चाळणीत चाळून घ्या. आणि काजूची बारीक पावडर मिळवा.
  • गॅस बारीक आचेवर ठेवून त्यावर एक कढई ठेवा. कढईत पाणी घाला व पाणी (WATER) गरम झाल्यास त्यात साखर (SUGAR) घाला. नंतर चांगले ढवळा व साखरेचा पाक तयार करुन घ्या.
  • त्यांनतर साखरेचा पाकामध्ये तयार केलेली काजूची पावडर घालून घ्यावी आणि चांगली मिक्स करून घ्यावी. मिक्स करतांना पावडरच्या गुठळ्या तयार होणार नाहीत याची काळजी घ्या.

  • मिश्रण चांगले मिक्स करून झाल्यानंतर त्यामधे एक चमचे गुलाबपाणी (ROSE WATER ), वेलची पूड (Cardamom) , साजूक तूप (GHEE) घालावे. आणि पुन्हा मिश्रण चांगले मिक्स करून घ्यावे.
  • त्यानंतर एका प्लेट मध्ये छान चांदीचे पान घ्यावे. आणि त्यावर काजू पातळीचे तयार केलेले मिश्रण घालावे. आणि मिश्रण चांगले थंड होऊन द्यावे.
  • थंड झाल्यास चांगले पीठ मळून घेणे. आणि एका प्लेट मध्ये ते मिश्रण घ्या, आणि बारीक आकारामध्ये पिस कापून घेणे. आणि फ्रीझ मध्ये ठेवून द्या.

हे ही वाचा:

‘चित्रपटांवर अनावश्यक कमेंट टाळा’ या पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया दिली प्रतिक्रिया म्हणाला

बाळासाहेब ठाकरे यांच्या चित्र अनावरणानंतर तरी त्यांना त्यांची चूक कळूदे, आदित्य ठाकरेंचा शिंदेगटावर हल्लाबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss