spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Jacqueline Fernandez ला कोर्टाकडून मोठा दिलासा

बॉलीवूड (Bollywood) मधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस (Jacqueline Fernandez) बद्दल एक खास बातमी पुढे येत आहे. मागील काही दिवसापासून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही चर्चेत होती. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तिचे नाव आल्याने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. बॉलीवूडमधील मंडळी तिच्यापासून अंतर ठेवू लागले होते.

बॉलीवूड (Bollywood) मधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस (Jacqueline Fernandez) बद्दल एक खास बातमी पुढे येत आहे. मागील काही दिवसापासून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही चर्चेत होती. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तिचे नाव आल्याने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. बॉलीवूडमधील मंडळी तिच्यापासून अंतर ठेवू लागले होते.

पण आता मात्र जॅकलिन बद्दल एक माहिती समोर येत आहे , ती म्हणजे जॅकलिन फर्नांडीसला (Jacqueline Fernandez) २००कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) मोठा दिलासा मिळाला आहे. जॅकलिनने दिल्लीच्या (Delhi) पटियाला हाऊस कोर्टाकडे (Patiala House Court) दुबईला (Dubai) जाण्यासाठीची परवानगी मागितली होती. कोर्टाकडून तिला दुबईला जाण्याची परवानगी मिळाली आहे. जॅकलिन फर्नांडीसने २७ जानेवारी ते २३ जानेवारी दरम्यान दुबईला जाण्यासाठीची याचिका दाखल केली होती, जी कोर्टाकडून मंजूर झाली आहे.

पेप्सिको इंडिया कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्यासाठी जॅकलिनला दुबईला जायचे आहे. जॅकलिनने दिल्ली न्यायालयात (delhi court) दाखल केलेल्या अर्जात म्हटले होते की, तिला दुबईतील पेप्सिको इंडिया कॉन्फरन्समध्ये (PepsiCo India Conference in Dubai) सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. रविवारी २९ जानेवारी रोजी शेड्युल कॉन्सर्टमध्ये जॅकलिनला स्टार परफॉर्ममर म्हणून आमंत्रित करण्यात आलं आहे. या तिच्या अर्जावर तिला कोर्टाकडून जामीन मिळाला आहे. तसेच मनी लॉन्ड्रिंग या प्रकरणात जॅकलिन अगोदरपासून अंतरिम जामिनावर बाहेर होती.

सुकेश चंद्रशेखरसोबत (Sukesh Chandrasekhar) जॅकलिन फर्नांडिसला लग्न करायचे होते. सोशल मीडियावर दोघांच्या पोस्टमुळे ते चर्चेत सुद्धा होते. सुकेश जॅकलिनला अत्यंत महागडे गिफ्ट कायमच द्यायचा. इतकेच नव्हे तर फक्त जॅकलिनच नाही तर बाॅलिवूडच्या अनेक अभिनेत्री सुकेशच्या संपर्कात होत्या. नोरा फतेहीचीही (Nora fatehi) सुकेश चंद्रशेखर प्रकरणात चाैकशी यापूर्वी झाली आहे.

हे ही वाचा:

Actress Jamuna Passes Away, ज्येष्ठ तेलुगू अभिनेत्री जमुना यांचं ८६ व्या वर्षी निधन

आता महाराष्ट्रात तिसरी आघाडी ? राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Pathaan Housefull, शाहरुख खानचा पठाण काश्मिरमध्ये करतोय जादू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss